
अर्धापूर| शहरात २०११ पुर्वीपासून गायरान जमीनीवर वास्तव करणांना नियमात बसवून घरांना लागणारी १५०० स्वायरफुट जागा देऊ, त्याकरिता रस्ते,जागा चा सुंदर ले आऊट सबंधीतांनी काढावा त्यानंतर इतरासह घरकुले या लोकांना देता येतील असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

भुमीगत गटार योजनेचा शुभारंभ अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते अर्धापूरातील तलाब मैदानात झाले, याठिकाणी जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.अमरनाथ राजूरकर होते तर प्रमुख पाहुणे गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरीहरराव भोसीकर, बबनराव बारसे, गणपतराव तिडके,प्रा.कैलास दाड,बि आर कदम, शामराव टेकाळे, राजेश्वर शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,मुसव्वीर खतीब, संतोष कल्याणकर,काजी सल्लाऊद्दीन, उध्दवराव राजेगोरे,शेख साबेर, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, शैलेश फडसे,मारोतराव जगताप,नासेरखान पठाण,पप्पू बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी धनगर समाजाकडून काठी व घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.

शहरातील २०० अपंग लाभार्थ्यांना २१०० रुपये प्रमाणे धनादेश वितरित करण्यात आले,बचत गटाच्या इमारतीसाठी ३ लाख रुपये निधीचा पाहुण्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले कि, जुन्या डब्यांना हिरवी झेंडी दाखविण्याची घटना रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे, नगरपंचायत शहरात मोठ्या निधीमुळे विकासाची गंगा वाहत आहे,आधी नाली बांधकाम व नंतर रस्ते करण्याचा प्रयत्नाला यश आले आहे,शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, पदवीधर व कसबा निवडणुकीत काॅगेससह आघाडीला मोठे यश आल्याने येणारा काळ आघाडीचाच आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, महिला बचत गटांना आर्थिक ताकद देऊ असे ते म्हणाले.

माजी आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले कि, मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात निधी अशोकराव चव्हाण यांनी आणला आहे, येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आघाडीचाच राहिन त्या दिशेने निवडणूकिचे निकाल येत आहे.हरीहरराव भोसीकर म्हणाले कि,जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी पुर्ण ताकतीने आघाडीसोबत आहे, त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठले आहे.यावेळी प्रस्ताविकात नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची उपस्थीतांना माहिती देऊन नवीन मागण्या केल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.मुख्तारोदीन काजी व आभार व्यंकटेश शेटे यांनी मानले.

याप्रसंगी प्रवीण देशमुख,गाजी काजी, माधव कदम, निळकंठराव मदने,डॉ विशाल लंगडे,शेख जाकेर, सलीम कुरेशी, व्यंकटी राऊत, सोनाजी सरोदे, नामदेव सरोदे,इंजी.नागनाथ देशमुख,आनंदराव कपाटे, व्यंकटराव साखरे, बाबाराव सरोदे,आर आर देशमुख,राजू बारसे, नवनाथ कपाटे, केशवराव इंगोले, बळवंत इंगोले, व्यंकटराव कल्याणकर,भगवान तिडके,जुबेर काजी,रंगनाथ इंगोले,बाळू पाटील धुमाळ, अमोल डोंगरे, शंकरराव टेकाळे, सचिन देशमुख,अशोक सावंत, संजय लोणे,बाळू लोणे,उमेश सरोदे, राजू पाटील, शंकर ढगे,शिवलिंग स्वामी,गोविंद गोदरे,राजू कल्याणकर,सुभाषराव कल्याणकर, सुभाषराव देशमुख,ज्ञानदीप साखरे, सय्यद मोहसीन,साहेबराव लोखंडे, सुनिल अटकोरे, कामाजी अटकोरे,सदाशिव कपाटे,पंडीत शेटे,डाडाळे,बाळू माटे, यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

२०० कोटींच्या वर निधीची कामे शहरात सुरू — अशोकराव चव्हाण
वसमत फाटा ते डॉ शंकरराव महाविद्यालय १०० कोटींचा रस्ता,भुमीगत गटार योजनेचा पहिला टप्पा ४२ लाख रुपये,शुध्द पाणी पुरवठा २७ कोटी, पोलिस ठाण्यात सुसज्ज इमारत,२५ कोटी तलाब (तळ्याचे) मैदानाचे सुशोभीकरण,भुमीगत गटार योजनेचा दुसरा टप्पा १३ कोटींचा मंजूर होणार आहे, स्मशानभूमीची संरक्षक भिंत यासह विविध विकास कामे शहरात सुरू आहेत, येणाऱ्या काळात ही कामे पूर्ण झाल्यास नंबर एकची अर्धापूर नगरपंचायत राहील असे ते म्हणाले.

खासदार लोकसभेत गैरहजर तर भंडारे,तेरवी, अंत्यसंस्काराला हजार — मा.आ.अमरनाथ राजूरकर
नांदेडचे खासदार लोकसभेत गैरहजर राहतात कधी हजर असले तरी बोलत नाहीत फक्त जनतेची धुळफेक करीत भंडारे,तेरवी, लग्न व अंत्यविधीला उपस्थित राहतात,विकासकामे का करत नाहीत याकडे जनतेंनी लक्ष देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
त्या ४० गदारांना जनता धडा शिकवेल — बबनराव बारसे
शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले फक्त खोक्यांसाठी ४० गद्दारांनी शिवसेनेत उभी फुट पाडली, केंद्र सरकारच्या चुकीच्या हस्तपेक्षामुळे पक्षच हायजॅक केला तेव्हा अशोकराव चव्हाण ऊध्दव ठाकरे यांना म्हणाले की,काॅग्रेसची अडचण असेल तर काॅग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, अशोकराव चव्हाण यांच्यावर पाळत ठेवणाराला शिवसेना स्टाईलने उतर देऊ असे ते म्हणाले.
