Friday, March 31, 2023
Home नायगाव घुंगराळा-तलबिड वनपर्यटनाच्या निधी तरतूदीसाठी वन विभागाचा हिरवा कंदील -NNL

घुंगराळा-तलबिड वनपर्यटनाच्या निधी तरतूदीसाठी वन विभागाचा हिरवा कंदील -NNL

भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांची यशस्वी मध्यस्थी ; सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांचे आमरण उपोषण सुटले

by nandednewslive
0 comment

नायगांव बा., रामप्रसाद चनांवार। गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घुंगराळा-तलबिड या वन /निसर्ग पर्यटनाच्या परिपूर्ण योग्यतेने विकास आराखडा बनविण्यासह त्यास मान्यता व निधीची तरतूद आणि उपलब्धतेसाठी वनविभागाकडून सकारात्मक भूमिकेचे आश्वासन मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांनी आज घुंगराळ्यात सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेतले यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी यशस्वी मध्यस्थी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील जागृत देवस्थान श्री.खंडोबा (श्री.म्हाळसाकांत) मंदिर, घुंगराळा व जागृत देवस्थान श्री.महादेव मंदिर गंगणबिड (तलबिड) ता.नायगांव (खै.) जि.नांदेड या दोन्ही तिर्थक्षेत्र/तिर्थस्थळासाठी भरिव निधी द्यावा सोबतच,येथे वन/निसर्ग पर्यटन केंद्राची मान्यता मिळाल्याने याबाबतचा तातडीने शासन निर्णय काढण्यात यावा तसेच,या दोन्ही मंदिर परिसरातील वनजमिनींचे एकत्रित संपादन करुनच येथिल सर्वांगीण विकासासाठी तातडीने परिपूर्ण योग्यतेने विकास आराखडा बनवून त्यास मान्यता देऊन शासनस्तरावरून भरिव निधीची तरतूद व उपलब्धतेसाठी महाराष्ट्र विधानमंडळाच्या सद्यास्थित चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच प्रयत्न व्हावेत म्हणून शासनाने लक्ष द्यावे. यासाठी सातत्याने विनंती व पाठपुराव्यानंतरही कार्यवाही होत नसल्यानेच उपरोक्त मागणी मार्गी लावण्यासह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागृत देवस्थान श्री.खंडोबा(श्री.म्हाळसाकांत) मंदिराच्या पायथ्याशी आज दिनांक ९ मार्च २०२३ रोजी मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मारोतीराव भवरे यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या दिनांक २८ जुलै २०१७ रोजीच्या कार्यकारी सभेत घुंगराळा-तलबिड वन/निसर्ग पर्यटन केंद्राला मान्यता देण्यात आली होती परंतू, यासाठी मागविण्यात आलेला विकास आराखडा अनेकदा त्रुटीत परत येत असल्याने तो परिपूर्ण व योग्यतेने बनवून त्यास मान्यतेसह निधीची तरतूद आणि उपलब्धता करावी जेणेकरुन या पर्यटनासाठी निधीची तरतूद व उपलब्धता झाल्यानंतर या परिसरातील सर्वांगीण विकास सोबतच, वनपर्यटनासह नव उद्योग वाढीसाठी निश्चितच प्रयत्न होणार आहेत त्याच अपेक्षेत सामाजिक दायित्व म्हणून भवरे हे सन् २०११ पासून या प्रकरणात सातत्यपूर्ण प्रयत्न करित असून या प्रकरणात राज्याचे वनमंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चेनंतरच यापूर्वी मान्यता मिळाली होती.

यापूढेही यासाठीची मान्यता व निधी तरतूदीसाठी आपण निश्चित प्रयत्नशील असल्याचे अभिवचन राज्याचे वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार व नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपणांस दिल्याचे भाजपा नेते बालाजी बच्चेवार यावेळी म्हणाले सोबतच,त्यांच्याच माध्यमातून लवकरच यासाठी निधीची तरतूद,उपलब्धता होणार असल्याचे व याबाबत त्यांनी वनविभागाकडून होत असलेल्या कार्यवाहीची माहिती नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्याशी चर्चा घडवून अवगत करुन दिली आणि तसे पत्र देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांनी दिले. त्यानंतर,भवरे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

दरम्यान घुंगराळ्याच्या सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार, उपसरपंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे,बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे,काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य मनोहर पवार,रघुनाथ सोनकांबळे, काॅग्रेसचे युवा नेते पंडित पाटील सुगावे,मोहन जोगेवार,बालाजी मातावाड, व्यकंटराव सुगावे, युवक काॅग्रेसचे देविदास पाटील सुगावे, भिमशक्तीचे भगवान भद्रे, नागोराव दंडेवाड,दत्ता पाटील मोरे,वडपत्रे, माजी उपसरपंच शिवाजी पाटील ढगे,वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष दिपक गजभारे, तुळशीराम कळकटवाड,शेख चाॅदपाशा, बालाजी हाळदेवाड, शेख सलीम,पत्रकार यशवंत थोरात,किरण वाघमारे, रामराव ढगे, प्रकाश महिपाळे,भगवान शेवाळे,सहदेव तुरटवाड,अंकुश देगांवकर आदींसह घुंगराळा- तलबिड परिसरातील नागरिक, पत्रकारांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठींबा दिला. कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी यावेळी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

अनेकांचा पाठींबा !
विशेष बाब म्हणजे या उपोषणाला मराठी पञकार परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष विजय जोशी,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, राष्ट्रवादीचे युवा नेते शिरीष गोरठेकर,काॅग्रेसचे युवा नेते प्रा.रविंद्र चव्हाण,शिवसेना सहसंपर्कप्रमूख गंगाधर बडूरे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर,विभागीय युवा प्रवक्ता चंद्रसेन गंगासागरे,दिगांबर गंगासागरे,राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर भिलवंडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे,मराठी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी आदींसह विविध सामाजिक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह पत्रकार व परिसरातील ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांनी पाठींबा दिला.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सकारात्मक प्रतिसाद !
महत्वाचे म्हणजे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भवरे यांच्या मागणीनुसार नुकतीच स्वतः सदरील वनक्षेत्राला भेट दिली असून याबाबतचा विकास आराखडा,मान्यता व निधी तरतूदीसाठी प्रयत्नशील असल्याने त्याचाही यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मराठी पञकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!