श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात सादर झालेल्या आणी गौरविण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठे ‘नारिशक्ती’ या चित्ररथाचे विशेष सादरीकरण करण्यात आले होते.
कर्तव्यपथावरील संचलनात १७ राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.साडेतीन शक्तिपीठे आणि ‘स्त्री शक्तीचा जागर’ या विषयावर हा चित्ररथ आहे.उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला. तर महाराष्ट्राच्या चित्ररथात माहूरची रेणुकादेवी, कोल्हापुरातील महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी माता, आणी वणी येथील सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तिपीठांचा देखावा साकारण्यात आला होता. सोबत गोंधळीही होते. ही सगळी शक्तिपीठे म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांना भेट देणाऱ्या भाविकांना, सर्वसामान्यांना हा चित्ररथ पाहता यावा या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
चित्ररथ माहूर भेटिला आले असता गुरुवार दि.९ मार्च रोजी स.११ वा. माहूरगड येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक विश्रामगृहावर प्रशासनाचे वतीने श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी यांनी विधिवत पूजन केल्यानंतर चित्ररथाच्या शोभा यात्रेस प्रारंभ झाला.
शहरातील विश्राम गृहावरून चित्ररंथ शोभायात्रा काढण्यात आली व रेणुका गडावर शुक्रवार दि,१० रोजी सायकाळ पर्यत भाविकांन साठी ठेवण्यात येणार आहे सुवासिनीणी जागोजाग काढलेल्या रांगोळी डोळ्याचे पारणे फेडत होत्या. शोभयात्रेत फोस्टर किड्स शाळेचे विद्यार्थी, शहरातील नागरिक, महिला व परीसरातील गावकर्याची मोठया संख्येने उपस्थिती होती.श्री रेणुकादेवी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी सुव्यवस्थेचे उत्तम नियोजन केले होते.