मुखेड, दादाराव आगलावे। दिनांक 11 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब मुखेड सिटी, धमणे ॲक्सिडेंट हॉस्पिटल व मातोश्री क्लिनिक लॅबोरेटरी मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने धमने ॲक्सिडेंट हॉस्पिटल, मुखेड येथे खास महिलांसाठी हाडाचे घनता (BMD) तपासणी ,तसेच रक्त (CBC)तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हाडाची ठिसूळता तपासणीसाठी मुंबई येथून खास मागवलेल्या मशिनरी द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. विशेषत 45 वर्षांपुढील महिलांसाठी व मासिक पाळी बंद झालेल्या महिलांसाठी उपयुक्त व आवश्यक ती तपासणी करण्यात येणार आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, टाच दुखी हाता पायांना मुंग्या येणे, संधिवात इत्यादी आजारासाठी ही तपासणी महत्त्वाची आहे.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे, यशोसाई हॉस्पिटल नांदेडचे संचालक डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल , रेड्डी हॉस्पिटल ,अहमदपूर येथील डॉ. वैभव रेड्डी यांच्यासोबतच मुखेड येथील पहिले ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सतीश धमने ही तज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहे. मुखेड व परिसरातील गरजू महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान रोटरी क्लब मुखेडचे अध्यक्ष रो. जगदीश बियानी, सचिव प्रा. संजय पाटील व या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन रो. डॉ. सतीश धमने यांनी केले आहे.
या शिबिरात पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, नाव नोंदणी करण्यासाठी अविरत हॉस्पिटल, विजय एम्पोरियम, मातोश्री हॉस्पिटल, धमने ॲक्सिडेंट हॉस्पिटल, अश्विनी डेंटल हॉस्पिटल, महालक्ष्मी ज्वेलर्स, आध्या डायग्नोस्टिक सेंटर, मुखेड या सर्व ठिकाणी नाव नोंदणी करता येईल. खास महिलांसाठी आयोजित केलेल्या या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान रोटरी क्लब मुखेड सिटी , धमने ॲक्सिडेंट , हॉस्पिटल व मातोश्री क्लिनिक लॅबोरेटरी मुखेड व सर्व रोटरी क्लब मुखेड सिटी संचालक मंडळ व सदस्य च्या वतीने करण्यात येत आहे.