
हिमायतनगर, चांदराव वानखेडे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळू उपसा होत आहे याकडे महसूल विभाग कानाडोळा करत असल्याने हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे सततच्या वाळू उपसा होत असल्याने पळसपुर परीसरात पैनगंगा नदी कोरडी पडली आहे.

मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरून हिमायतनगर ऊमरखेड तालुक्यातुन वहाते पैनगंगा नदी वरील कोणत्याही वाळू घाटाची हर्रासी झाली नसतांना पळसपुर परीसरात सर्रास वाळु उपसा होत असल्याने पळसपुर परीसरात पैनगंगा नदी गांजेगाव पुलापर्यंत नदी कोरडी पडल्या चे चित्र दिसत आहे.

वाळू उपसा होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे तर दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायला लागले या बाबतीत शासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळु माफी या यशस्वी होत आहेत परंतु नागरिकांना व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

ईसापुर 100टक्क भरले असून सुद्धा पाणी पुरवठा होत नाही हि खेदाची बाब आहे पैनगंगा नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा होतो या आशेने शेतकरी उन्हाळी हंगामासाठी मशागत करून पेरणी करावी तोच नदी पात्रात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. याबाबीकडे लक्ष देऊन पैनगंगा नदीच्या पात्रातून पाणी सोडण्यात यावे अनेक वेळा मागणी आंदोलनं करुन सुद्धा शेवटी पळसपुर परिसरातील जनतेची पदरी नीराशा या परीसरातील पैनगंगा नदीला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे.

