
नांदेड| समाजातील विकलांग व्यक्तींना सामान्य लोकांप्रमाणे स्व-कर्तुत्वावर उमेदीने जगता यावे यासाठी, “भारत परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र (पुणे)” हि संस्था मोठा आधार बनली आहे.या केंद्राच्या माध्यमातून नांदेड येथील श्री.गुरुजी रुग्णालयाच्या संयुक्त सहकार्यातून, नांदेड येथे रविवार दि. 5 मार्च रोजी “कृत्रिम मॉड्युलर हात-पाय मोजमाप शिबिर” घेण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यासह कर्नाटक व तेलंगाना राज्यातील दिव्यांगाचा उदंड प्रतिसाद लाभला.यावेळी तिनशे दिव्यांग व्यक्तींची कृत्रिम मॉड्युलर हात-पाय अवयव मोजमापणी करण्यात आले.तत्पूर्वी या शिबिराचे उदघाटन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व विभागीय रेल्वे प्रबंधक, श्री उपेंद्रसिंघजी नांदेड यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.(एम.एन.जि.एल.) गेल इंडिया लि. व बी.पी.सी.एल.च्या संयुक्त प्रकल्प सी.एस.आर. सहायता अंतर्गत नांदेड येथे भारत विकास परिषद विकलांग पुनर्सवन केंद्र व येथील श्री गुरुजी रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरात २०० गरजु दिव्यांग व्यक्तिनी कृत्रिम मॉड्युलर पाय-हात व पोलिओ कॅलिपर्स मोजमाप घेण्याचे उद्दिष्ट निर्धारित होते. मात्र महाराष्ट्रातील १७ जिल्हे व ३ राज्यातील रुग्णांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने जवळपास ३०० जणांची मोजमापणी करण्यात आल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून ज्या विकलांग व्यक्तींचे कृत्रिम मॉड्युलर हात-पाय मोजमापणी करण्यात आली आहे अशा गरजू विकलांग व्यक्तींना दि. 7 मे 2023 रोजी श्री. गुरुजी रुग्णालय येथेच अत्याधुनिक कृत्रिम अवयवांचे वितरण केले जाणार आहे- अशी माहिती श्री गुरुजी रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.

तत्पूर्वी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की विकलांग व्यक्ती सुद्धा समाजाचा महत्वाचा घटक असून अशा घटकांना त्यांच्या पायावर उभे करण्याची सेवा भारत विकास परिषद व श्री गुरुजी रुग्णालय संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून दिली आहे.समाजातील वंचीत-उपेक्षित घटकांसाठी अशा प्रकारे काम करणारी रुग्णालये अधिक संख्येने निर्माण झाली पाहिजेत- असा आशावाद श्री. कोकाटे यांनी व्यक्त केला. याच सातत्याने श्री अभिजित राऊत, मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन शिबिरास व उपक्रमास शुभेच्या देऊन अशा उपक्रमास सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

यावेळी रेल्वे विभागाचे मुख्य प्रबंधक उपेंद्रसिघजी, श्री. विनय खटावकर, डॉ.सुशील राठी श्री.गोपाल होलाणी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.अर्चना बजाज यांनी तर सूत्रसंचालन डॉ.शेखर चौधरी यांनी केले. तर ऋणनिर्देश श्री शंतनू सांगवीकर यांनी केले. मोजमाप तज्ज्ञ म्हणून वासुदेव कालरा प्रशांत सातपुते विजय गोरे शंतनू नाईक विक्रम महाडिक संजय शर्मा व बोरगावकर आदींनी काम पाहिले. सदरचे शिबीर- यशस्वेकरिता श्री गुरुजी रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व डॉक्टर्सच्या चमूने गेले ८ दिवस अथक परिश्रम केले.

