
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष आ.अॅड. जयदेव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड ग्रामीण सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी दिगांबर तुकाराम गवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र नांदेड ग्रामिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहररावजी भोसिकर यांच्या हस्ते देण्यात आले.

दिगांबर तुकाराम गवळे हे एक शिक्षण संस्था चालक रा. होकर्णा ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी आहेत. त्यांचे वडील माजी जि.प. सदस्य तुकाराम गवळे हे बेटमोगरा, चांडोळा, जांब, होनवडज या सर्कल मधून सन 1972 ते 1997 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून व महाराष्ट्र समाज कल्याण क्रिडा व बौद्ध सल्लागार मंडळावर सन 1987 ते 1989 तीन वर्षे सदस्य होते.

त्यांचे पुत्र हे जिल्हा परिषदेत नांदेड येथे शासकीय सेवेत कार्यरत होते ते सन 2016 रोजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले. 35 वर्षे जिल्हा परिषदेत सेवा केल्यामुळे अधिकारी, आजतागायतचे माजी आमदार माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती त्यांनी 26 वर्षे पदाधिकारी व पतसंस्थेचे संचालक सचिव म्हणून काम केले आहे. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून बर्याच वर्षापासून कार्य करीत आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या विभागात यांनी शासकीय सेवा केल्यामुळे त्यांचा जिल्हाभर मोठा जनसंपर्क असून सद्यस्थितीत राष्ट्रवादी शिक्षण संस्था संघात जिल्हा सरचिटणीस म्हणून ते काम करीत होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. विक्रम काळे साहेबांच्या प्रचारात मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली.

एकंदरीत त्यांनी पक्षावर असलेली निष्ठा गेल्या अनेक वर्षापासून पक्षात केलेले काम पाहून जिल्हा अध्यक्ष हरिहररावजी भोसिकर यांनी सामाजिक न्याय प्रदेश अध्यक्षाकडे शिफारस केली होती. यावेळी डी.बी. जांभरुनकर सचिव रा.काँ. पक्ष, उपाध्यक्ष गजानन पांपटवार, प्रदेश प्रतिनिधी वसंत सुगावे पाटील, सरचिटणीस डॉ. विक्रम देशमुख, उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर, नायगाव राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडुरे, डॉ. उत्तम सोनकांबळे, सत्कारा प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पदी दिगांबर गवळे यांचे अभिनंदन केले असता त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा दौरा करुन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून नविन काम करणार्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत सामावून घेण्याची संधी देण्याविषयी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले.

