
उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे भुत्याचीवाडी ता.कंधार येथे दि.१३ मार्च २०२३ रोज सोमवारी श्री. मल्हारी म्हाळसाकांत प्राणप्रतिष्ठापणा मित्ती व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्राणप्रतिष्ठापणा श्री. समगीर महाराज यांच्या शुभहस्ते तर कलशारोहण सोहळा श्री. शामगीर महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या आनंदमयी सोहळ्यात मौजे भुत्याचीवाडी येथे दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यादरम्यान ६ मार्च ते १३ मार्च दरम्यान गायणाचे आयोजन केले आहे. यामध्ये कचरू महाराज वाघोबा भुत्याचीवाडी ,उत्तम ननुरे येलुर , बाबाराव वागे संगुचीवाडी ,निशांत वाघोबा गजभारे ढाकणी , दि.१० मार्च रोजी उत्तम वाघोबा गुंडेवाडी ,

११ रोजी गोविंद वाघे लालवाडी १२ रोजी तेजेराव वाघे संगुचीवाडी ,तर १३ रोज सोमवारी विठ्ठल वाघोबा महाराज दिवटे ,मोकलेवाडी त्याच दिवशी श्रीसंत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गांवकरी मंडळी भुत्याचीवाडी यांनी केले आहे.

