
नायगांव बा.,रामप्रसाद चनांवार। नांदेड नायगाव मार्गे देगलूर बिदर या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य सरकार अर्धा हिस्सा उचलण्याच्या तरतूदीचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याने या कामासाठी निश्चितपणे चालना मिळणार असल्याचा आशावाद भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त करुन यासाठी केंद्र व राज्य सरकारचे जाहीर आभार मानले आहेत.

नांदेड-नायगाव-देगलूर- बिदर या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासन अर्धा भार उचलेल असा निर्णय अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे राज्य सरकारने आपल्या हिश्याचा अर्धा भार घेतल्यामुळे नांदेड नायगाव मार्गे देगलूर बिदर हा रेल्वे मार्ग जाहीर होऊन बराच कालावधी झालेला असला तरिही या रेल्वेमार्ग निर्मितीच्या कामाला सुरुवात होत नव्हती म्हणून नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व बिदरचे खा. भगवंतजी खुबा यांनी केंद्राकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून राज्याचे भाजपाचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता.

सोबतच,यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सतत प्रयत्न केल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करून या रेल्वे मार्गाचा निर्मितीचा अडथळा दूर झाला असून या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे नांदेड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ तसेच,लगतच्या राज्यात विकासाला चालना मिळणार आहे या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे औद्योगिक करणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे या मार्गासाठी विशेष करून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर,खासदार भगवंतजी खुबा यांच्याबाबतीत निश्चितच कृतज्ञता असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केली.

