
किनवट शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील जलधरा येथील माजी आमदार कै.किशनराव पाचपुते यांच्या जन्मभूमीत क्रांतिकारक सोमा-डोमा (आंध) उमरे यांच्या जयंती सोहळ्यानिमित उद्या दि.११ मार्च शनिवार रोजी आरोग्य शिबीर आणि आंध आदिवासी दंडार स्पर्धा आयोजित केली आहे.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारपे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ.श्याम वाकोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे यांची उपस्थिती राहणार आहे. आंध आदिवासी दंडार स्पर्धेचे उद्घाटन गोमाजी मेंडके यांच्या हस्ते होणार असून माजी आमदार उत्तमराव इंगळे उमरखेड यांच्या अध्यक्षतेखाली माजी जि.प. अध्यक्षा जनाबाई डूडूळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. डी. बी. आंबोरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दंडार स्पर्धेचे पाहिले बक्षीस अनुक्रमे ११ हजार दुसरे ९ हजार ,तिसरे ७ हजार ,चौथे ५ हजार ५५१,पाचवे ५ हजार १५१,सहावे ५ हजार १ रुपये असे आहे आरोग्य शिबिरा करिता समाजाचे अनेक तज्ञ वैद्यकीय अनुवभी डॉक्टर मंडळी सेवा देणार आहेत. यावेळी दादाराव टारपे, खंडेराव मोदे,भगवान वंजारे, आनंदराव दुमारे, कमलबाई हुरदूक,अनिता चारोळे, राधाबाई किरवले, निलाबाई बोंबले,माधव डोखळे, सुरेखाताई वानोळे,सविताबाई ढोले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते,सर्व सरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य ,सेवानिवृत्त अधिकारी ,कर्मचारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आंध आदिवासी समाजाच्या सांस्कृतिचे दर्शन घडावे आणि आंध आदिवासी समाजाची अस्मिता व अस्तित्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा लाभ किनवट तालुका सह जलधारा, इस्लापुर, शिवणी परिसरातील जनतेने घ्यावा असे आवाहन आयोजक प्रा.विजय खूपसे,डॉ उत्तम धुमाळे,प्रा किशन मिरासे,गोपीनाथ बुलबुले,डॉ सुभाष वानोळे,माधव डोखळे, बालाजी भिसे,माजी जि. प. सदस्य भगवान हुरदूके,अभि प्रकाश टारपे,डॉ.आशिष डूडूळे, विठ्ठल वाकोडे,जयवंत वानोळे,दिलीप बोंबले, शेषराव ढोले,पंडित व्यवहारे, दिगंबर खूपसे,रामकीशन टारपे यांनी केले आहे.

आरोग्य शिबिरासाठी तज्ञ वैदयकीय मंडळी – एम.डी.मेडिसीन,जनरल सर्जन,स्त्री रोग तज्ञ,बालरोग तज्ञ,भूल तज्ञ,वातविकार तज्ञ, सोनोग्राफी तज्ञ, कॅन्सर तज्ञ, नेत्र रोग तज्ञ,एम.एस. सर्जन, दंत तज्ञ,मानसउपचार तज्ञ,मधुमेह तज्ञ,प्रयोग शाळा सह विविध आजाराचे निदान तज्ञ उपस्थित राहणार आहेत.

