
नांदेड। फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, सीटू आणि जनवादी महिला संघटनेचे बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु असून अखंड सहा दिवस उपोषण देखील केले आहे. नांदेड जिल्ह्यातील बोगस दस्त नोंदणी, मुद्रांक व जमीन घोटाळा उघडकीस अनणारे कॉ.गंगाधर गायकवाड हे राष्ट्रीय इंग्रजी वृतपत्र ‘ द हिंदू ‘ चे चांगला प्रेस मिळविलेले कार्यकर्ते आहेत.

त्यांच्या तक्रारीची दखल घेत मुद्रांक महनिरीक्षक पुणे आणि महाराष्ट्र राज्य सचिव यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना जमीन, मुद्रांक आणि बोगस दस्त नोंदणी घोटाळा प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
तेव्हा दोन महिन्यात झालेल्या दस्त नोंदणीची तपासणी करून 186 दस्त नोंदणी बोगस झाल्याचे सिद्ध झाले होते. आणि विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल झाले आहेत. कॉ.गायकवाड यांची मूळ मागणी ही मागील तीन किंवा दहा वर्षामध्ये झालेली दस्त नोंदणी तपासून कारवाई करावी ही आहे. तसेच दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी या साठी वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत पत्र व्यवहार झाला आहे आणि चालूच आहे.

गुन्हे दाखल करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मुद्रांक यांनी कॉ. गायकवाड यांना लेखी स्वरूपात कळविले असून सध्या स्थितीत आपली भूमिका बदललेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक यांना सुरू असलेल्या आंदोलनाची प्रत दिली असल्यामुळे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शक सूचना मागवून गुन्हे दाखल करावेत व मूळ मागणीप्रमाणे कार्यवाही करावी यासाठी आंदोलन सुरूच राहील असा इशारा माकप सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिला आहे.

