
हिमायतनगर। मौजे सिरंजणी ता. हिमायतनगर येथील काही गावांतर्गत रस्ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून मजबुतीकरण व बांधकामच्या प्रतीक्षेत आहेत. ह्या प्रलंबित मागणीसाठी सरपंच सौ मेघा पवन करेवाड यांनी हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय नेते श्री बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब व भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष श्री आशिष सकवान यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. बाबुराव कोहळीकर व आशिष सकवान यांनी मागणीची गंभीर दखल घेऊन सदरील कामासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून तात्काळ निधी मंजूर करून दिला.

भूमिपूजन प्रसंगी बोलतांना बाबुरावजी कोहळीकर यांनी गावाकऱ्यांच्या एकजुटीची प्रशंसा केली व सिरंजणी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासित केले. तर आशिष सकवान यांनी सिरंजणी गावातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून ग्रामपंचायत ची सत्ता आमच्या कडे सोपवली,राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शिंदे -फडवणीस यांच्या माध्यमातून भाजपा शिवसेना युती सरकार मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे मंत्री संदिपानजी भुमरे यांच्या विशेष सहकार्यातून तसेच नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील सिरंजणी चा कायापालट करून एक मॉडेल ग्रामपंचायत म्हणून सादर करून तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन करणार असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच प्रतिनिधी श्री पवन करेवाड यांनी केले सूत्रसंचालन श्री परमेश्वर घुंगरे व आभार प्रदर्शन श्री प्रल्हाद भाटे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री किसन देवसरकर यांनी भूषवले प्रसंगी विजय वळसे,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी, किसनराव वानखेडे, राजू पाटील शेलोडेकर, संतोष कदम डोल्हारीकर, वामन मिराशे, गौरव सुर्यवंशी खडकीकर, प्रकाश ताडेवाड, गजानन हरडफकर, ज्ञानेश्वर पुठेवाड,बालाजी ढोणे, कल्याण ठाकूर, दिनेश राठोड, गौतम दवणे (सरपंच कोठा ) व शेकडो गावकरी उपस्थित होते.

