
नवीन नांदेड। सिडको वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था म.सिडको नांदेड या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बालाजी मटकमवाड तर उपाध्यक्षपदी विलास बिरादार यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी मा.डॉ शुभांगीताई संभाजीराव गौंड यांच्या अध्यक्षतेखाली 10 मार्च2023 रोजी दुपारी तीन ते पाच या वेळात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे बिनविरोध संचालक व सभासद बांधव यांची उपस्थिती होती,नुतून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

सिडको वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था म. सिडको नांदेड या पतसंस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दिनांक 10 मार्च 2023 (शुक्रवार) रोजी निवडून आलेल्या संचालक मंडळाची निवडणूक तालुका उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शुभांगीताई संभाजीराव गौंड यांच्या मार्गदर्शनाने बिनविरोध पार पडली.

या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बालाजीराव मटकमवाड, उपाध्यक्ष विलासराव बिरादार, सचिव संजय सूर्यवंशी, कोषाध्यक्ष गोविंदराव अडकुणे यांची संचालक मंडळातून बिनविरोध निवड संपन्न झाली,ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पतसंस्थेचे लेखपाल सुरेशराव कुलकर्णी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालक मंडळ,सौ. शशिकलाताई जाधव(बिरादार),सौ. शकुंतलाताई गुरव, शेख निजाम गवंडगावकर, उत्तम टाकळीकर ,संतोष भोसीकर ,विलास वंजे,दिगंबर श्रीकंठे यांची उपस्थिती होती.

