
नवीन नांदेड। नांदेड दक्षिण हा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बालेकिल्ला अबांधित राहील असे प्रतिपादन शिवसेनचे जिल्हा प्रमुख दता पाटील कोकाटे यांनी नांदेड दक्षिण ऊध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनापक्ष सिडको शहराचा वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार आयोजित जयंती निमित्तीने य विविध कार्यक्रम प्रसंगी दक्षिण जिल्हाप्रमुख दता भाऊ कोकाटे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १० मार्च रोजी तिथी नुसार नांदेड दक्षिण शहर शिवसेनेच्या वतीने सिडको हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करून विधीवत पुजन करण्यात आले तर सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता, शिवसेना शहरप्रमुख जितुसिंग टाक, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख ब्रिजलाल ऊगवे व पदाधिकारी यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी हडको व सिडको येथील पुतळ्याला अभिषेक व विधीवत पुजन करून पुतळया जवळ जयंती निमित्त फुलांची सजावट करून भगवे ध्वज ,पताके,व रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात शिवसेनानांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख दता पाटील कोकाटे, डॉ.मनोज भंडारी, सह संपर्क प्रमुख भुजंग पाटील, महानगर प्रमुख पप्पू जाधव, प्रकाश मारावार, युवासेना जिल्हा प्रमुख व्यंकटेश मामीलवाड, वंचित आघाडी चे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, गोपाल सिंह टाक, उपजिल्हा प्रमुख यंकोबा येडे, तालुका प्रमुख अशोक मोरे,गौरव कोटगिरे, युवा सेनेचे हरकरे ,नितीन सरोदे,विजय अण्णा,बाबासाहेब निळेकर,तुकाराम पांचाळ,ऊपशहर प्रमुख नंदु वैध, अविनाश तरोडेकर व पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती. यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसादाचे वाटप उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख दता पाटील कोकाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला,माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, निवृत्ती जिंकलवाड, पप्पु मैड, विष्णु कदम, सतिश खैरे, संदीप जिल्हेवाड,माजी ऊपशहर प्रमुख दिपक देशपांडे, तुकाराम पांचाळ,कृष्णा पांचाळ,गौरव दरबस्तवार, गणेश जैस्वाल, संजय काळे यांच्या सह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले.

तर महाप्रसादाचा लाभ व्यापारी, नागरीक यांनी घेतला.सुत्रसंचालन साहेबराव मामीलवाड यांनी केले तर प्रास्ताविक सिडको शिवसेना शहरप्रमुख जितुसिंग टाक,यांनी केले, यावेळी कामगार सेनेचे ब्रिजलाल ऊगवे ,यांच्या सह आजी माजी पदाधिकारी यांच्या जिल्हा प्रमुख दता भाऊ पाटील कोकाटे व उपस्थित मान्यवराचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

