
नवीन नांदेड। नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक 20 मधील नगरसेवक आणि समाजसेवक श्रीनिवास जाधव यांना दुबई येथे ‘ बेस्ट सोशल वर्कर अवार्ड ‘देऊन नुकतेच प्रमुख पाहुणे एस.के.ग्रुप्सचे प्रमुख सचिन चव्हाण, दुबई येथील ड्रीम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन दुबई येथील एस के ग्रुप, ए एन पी ग्रुप ऑफ दुबई आणि पुण्यातील स्वयंदीप फाऊंडेशनच्यावतीने दुबई येथे दरवर्षी अशा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते आणि राज्यातील विविध मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून पुण्यातील अधिकारी व विचारवंत डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम दरवर्षी दुबईत घेण्यात येतो. यावर्षी हा सोहळा ६ मार्च रोजी दुबई येथील पंचतारांकित मीडिया रोटाना या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस.के.ग्रुप्सचे प्रमुख सचिन चव्हाण, दुबई येथील ड्रीम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला, मिनाझ फईम, यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे व राहुल भातकुले हे उपस्थित होते. दुबई येथे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

श्रीनिवास जाधव यांचा नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 20 मध्ये मोठा जनसंपर्क असून येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या वार्ड मध्ये विविध विकासकामे आणि विकास कामे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दुबई स्थित एका सामाजिक संस्थेने द बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.

पुरस्कार मिळ्याबद्दल नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास जाधव म्हणाले की मी आतापर्यंत केलेल्या कार्याची आणि समाजसेवेची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. सामान्य नागरिकांचे कार्य आणि सतत त्यांच्या विकासासाठी विचार करून मी माझ्या वार्डमध्ये विविध विकास कामे केलेली आहेत. हा गौरव माझ्या वाढ मधील प्रत्येक नागरिकाचा आहे. या पुरस्कारने नवीन संधी आणि जोमाने नागरिकांच्या समस्या सोडवण्याची ताकद मिळाली आहे मी सदैव नागरिकांच्या सेवेस तत्पर राहील, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले आहे.

