हदगाव, शे चांदपाशा। हदगाव शहराजवळ मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर व तुळजापुर ते नागपुर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेनगंगान दीवरील जुना पुल ‘जड वाहनामुळे व पुलावर कठडे नसल्याने धोकादायक बनला आहे. यापुर्वी पण या पुलावरुन अनेक आपघात झालेले असुन, या जुन्या पुलाकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष असल्याने नवीन पुल होण्याअगोदर या पुलला वाचविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. परंतु याकडे आमदार खासदारांचे साफ दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
मराठवाडा व विदर्भाला या जोडणारे या पुलाचे बाधकाम अंदाजे १९७६ साली झाल्याचे जाणकार सागतात कारण या बाबतीत हदगाव सां.बा. उपविभाग कडे याची माहीती उपलब्ध नसुन हा पुल राष्ट्रीय महामार्गात गेल्याने या बाबतीत राष्ट्रीय महामार्गचे आधिकारीच या बाबतीत माहीती देवू शकतील. अस सागून संबंधित विभागाने आपली जबाबदारी झटकून टाकलेली आहे. आज या पुलाला ४६ वर्ष पुर्ण होत आहे. या पुलाने आता पर्यत मराठवाडा व विदर्भाला दळणवळण करिता जोडण्याचे काम केलेले आहे. कालतराने सदर पुल राष्ट्रीय महामार्गात गेल्याने बाजुलाच नवीन पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. नदीत सिमेंटचे पिल्लर पण टाकण्यात आले. कुठं माशी शिंकली हे पुलाचे काम गेल्या चार वर्षापासुन रखडलेले आहे.
या पुलावरुन मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भातील नागपुर, मध्यप्रदेश सह देशातील अनेक राज्यातील राञ अन् दिवस वाहनाची ये-जा सुरू असते. या बाबतीत सदर पेनगंगानदी वरील हा जुना पुल मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवरुन वाहणाऱ्या नदीवर आहे. आपघात घडला की मराठवाडा व विदर्भातील पोलिस स्टेशनला आपली हद कायम करुन आपले काम करावे लागते. दुर्घना घडली की ती आपल्या हद्दीत आहे की नाही यातच पोलिसांचा वेळ जातो ही वस्तुस्थिती आहे.
क्षमते पेक्षा जड वाहने धावतात….!
मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या या पेनगंगा नदीवरील ये-जा करणाऱ्या वाहनामध्ये १८ टन वजनापर्यतची वाहने धावू शकतात. एवढी क्षमता या पुल व मार्गाची आहे. परंतु काही वर्षापासून जुन्यापुलावरुन ४०ते ५० टन वजनापर्यत माल भरलेली जड वाहने नेहमी ये-जा करतात. त्यामुळे एकीकडे वारंगा ते महागाव राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामामुळे अनेक अपघात होत आहेत या जड वाहनामुळे या जुन्या पुलाला धोका निर्माण झालेलं आहे. विशेष म्हणजे या संबंधित विभागाला याची जाणीव असुन सुद्धा ठोस पाऊल उचलेले जात नाही. या पुलावरुन यापुर्वी अनेक अपघात घडलेले आहेत. नेहमी आपघात घडावे अशीच वाट संबंधित विभाग पाहत तर नाही ना..? अशी शंका नागरिकात ऐकवायास मिळत आहे.
विधानसभाचे आमदार दोन असले तरी खासदार एक आहे..!
पेनगंगा नदी ही मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवरुन वाहते मराठवाड्यातील नादेड जिल्ह्यात हदगाव विधानसभा क्षेञात या पुलाचा काही भाग तर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभाक्षेञात या पुलाचा भाग येतो. विशेष म्हणजे हे दोन्ही विधानसभाक्षेञ हे हिगोली लोकसभा मध्ये येतात. त्याचे खा हेमत पाटील हे आहेत, त्यांनी हदगाव विधानसभा व उमरखेड विधासभाक्षेञा राज्याचे मुख्यमंत्री याचेशी जवळकीता साधुन राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन पुल मंजुर करुन घेतलेली आहे. परंतु मराठवाडा व विदर्भाला जोडणा-या नवीन पुलाच्या ४ वर्षापासुन रखडलेल्या पुला बाबतीत माञ त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसुन येते हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.