नांदेड| तरोडा बुद्रुक जेतवन नगर येथील युवक चंदन रामराव गायकवाड यांनी सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत चंदनने हे यश संपादन केले आहे. आज त्याचा जेतवन नगर सोसायटी व जेतवन बुद्ध विहार समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.डॉ. अतुल चंद्रमोरे, प्रवीण कुपटीकर, सुमित गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक पाईकराव, पोलीस कॉन्स्टेबल रवी लोहाळे आदींची उपस्थिती होती. नेटबॉल नांदेड जिल्हा असोसिएशनचा चंदन हा विद्यार्थी आहे. प्रवीण कुपटीकर, प्रशिक्षक सुमित गायकवाड यांनी त्याला याविषयीचे प्रशिक्षण दिले. या यशाचे श्रेय आई क्रांती व वडील रामराव गायकवाड यांना दिले आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. जेतवन नगर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठित व्यक्ती, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.