
लोहा| छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याची स्थापना गोर गरिब रयतेला शोषणातून मुक्त करण्यासाठी केली . सामाजिक समतेचा विचार त्यांनी रुजविला शिवरायांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून करावी. तिला वैचारिक अधिष्ठान असावे. असे प्रतिपादन राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केले .

जुना लोहा येथे शिवजन्मोत्सव निमित्ताने व्याख्यानमालेचे विचार पुष्प गुंफताना बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रोहिदास चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अधिकारी अनिल मोरे, काँग्रेस शहराध्यक्ष वसंतराव पवार, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख नवनाथबापू चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, साहित्यिक डॉ. संजय बालाघाटे, नाटय लेखक, शेषराव कहाळेकर ,नगरसेवक संभाजी चव्हाण,माजी नगरसेवक रमेश माळी बापू गायखर, अनिल दाढेल, यासह मान्यवर उपस्थिती होते.

छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर विचार मांडताना सेवानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे म्हणाले की , तरुणांनी शिवरायांचा आचार आणि विचार अंगिकारून स्वतःची उन्नती करताना अनिष्ठ राजकारण व प्रवृत्तींपासून दूर राहत आई – वडिलांची सेवा करावी, शिवरायांनी सामाजिक समतेचा विचार दिला तसेच आज शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याना शिक्षण द्यावे सुसंकरित करावे असे मार्गदर्शन श्री नांदेडे यांनी केले.

आभार प्रदर्शनावेळी माजी आ रोहिदास चव्हाण यांनी व्याख्याना मागील भूमिका मांडली. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी अनिल मोरे, डॉ . संजय बालाघाटे, बालाजी जाधव यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी केले . सूत्रसंचालन व आभार विनोद गवते यांनी केले . कार्यक्रमा स शहरातील शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

