
नवीन नांदेड। नवीन नांदेड सिडको भागातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा टेक्सकॉम येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते देविदास पाटील कदम यांची. ई.पी.एस. 95 राष्ट्रीय संघर्ष समिती नांदेड दक्षिणच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या निवडीचे मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

सदरील निवडीचे नियुक्तीपत्र प्रांताध्यक्ष स.ना.आंबेकर, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जी.यल्लया,विवेक चौधरी, गंजेवार, गणेश कांबळे, मोहम्मद नुरोद्दीन, काशिनाथ गरड, यांच्यासह अनेक ई.पी.एस. 95 राष्ट्रीय संघर्ष समिती चे पदाधिकारी उपस्थित होते. सदरील निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

