
नवीन नांदेड। सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे पंतप्रधान जन आरोग्य योजना व आभा नोदंणी शुंभारभ ११ मार्च २३ रोजी वैद्यकीय अधिकारी संतोष शिंदे, आरोग्य सहाय्यक सुरेश आरगुलवार, व आशा वरकस मातृ सेवा केंद्र सिडको चे भरत मुंडे, गोपाल कदम, यांच्या उपस्थितीत करण्यात आला असून नागरीकांनी या योजने अंतर्गत नोदणी करून वैद्यकीय सुविधा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारत सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत नांदेड वाघाळा मनपा झोन ६ मातृ सेवा आरोग्य दवाखाना अंतर्गत या नोदणी चा शुभारंभ करण्यात आला आहे, या योजनेचा अंतर्गत प्रत्येक पात्र कुंटूबास वर्षाकाठी पाच लाख पर्यंत शासन खर्च करणार आहे.

योजनेचे फायदे देशभरात निवडलेल्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात, या सेवा मध्ये औषध उपचार, तपासणी डॉक्टर फी, रूम भाडे, तज्ञ डॉक्टर फी, बाहय रुग्ण सेवा, आयसीयु शुल्क इत्यादी ऊपचाराशी सर्व खर्च समाविष्ट आहे, सदर योजना लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणुन नोदंणी करावी असे आवाहन मातृ सेवा रूग्णालय सिडको वतीने करण्यात आले आहे, या आवाहनाला प्रतिसाद देत जेष्ठ नागरिक, युवक महिला यांनी नोदंणी साठी गर्दी केली आहे.

