
माहूर। डोंगराळ,आदिवासी आणि अतिदुर्गम तसेच नक्षल प्रवण क्षेत्र गावं म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे आजनी येथे कॉ.लता गायकवाड यांनी दि.१२ मार्च रोजी स्थापना दिनानिमिताने आजनी येथील महिलांची बैठक घेऊन नवीन युनिट स्थापन केले असून सभासद नोंदणी देखील करण्यात आली आहे.

लवकरच स्थनिक आणि जीवनमरणाच्या मागण्या घेऊन तहसीलदार माहूर आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे युनिट अध्यक्ष कॉ.गयाबाई कुडमेथे व सचिव कॉ.देवकाबाई टेंबरे यांनी बोलून दाखविले आहे.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना ही देशातील सर्वातमोठी महिलांची संघटना असून नांदेड जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणी करण्यात येत आहे. माहूर,किनवट,अर्धापूर,भोकर,मुदखेड आणि नांदेड शहरात सभासद नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड,नांदेड तालुका अध्यक्ष कॉ.लता गायकवाड,सचिव कॉ.मनीषा धोंगडे, अर्धापूर तालुका निमंत्रक कॉ.सुंदरबाई वाहुळकर,किनवट तालुका अध्यक्ष कॉ.सैलिया आडे,सचिव कॉ.सुनीता बोनगीर आदी महिला पुढारी संघटनावाढीसाठी प्रयत्नशील आहेत.

महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडून शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न सोडविणे हा उद्देश घेऊन वाटचाल सुरु आहे. आजनी येथे स्थापन केलेल्या युनिटमध्ये अध्यक्ष पदी गयाबाई कुडमेते, सचिव पदी देवकबाई टेंबरे,कार्याध्यक्ष पदी इंदिराबाई टेंबरे,उपाध्यक्ष पदी यमुनाबाई जुगनाके तर सह सचिव पदी चंद्रभागा सिडाम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

