
पुणे| शहर विकासाशी निगडित मुद्द्यांवर निगडित सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी आयोजित ‘गोल्डन डायलॉग्स’ या संवादमालेतील ‘ क्लायमेट अॅक्शन फॉर सस्टेनॅबिलिटी ‘ विषयावरील चर्चासत्राला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.

‘ जागतिक तापमान वाढीचा धोका पाहता, पर्यावरण संवर्धन केले नाही तर,कार्बन उत्सर्जनाबद्दल कर भरण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि उत्सर्जन कमी करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे ‘ असा सूर या चर्चासत्रात उमटला. ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘ गोल्डन डॉयलॉग्ज ‘ संवादमालेतील हे दुसरे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

‘११ मार्च २०२३ रोजी सायं ४ ते ६ वाजता नवलमल फिरोदिया ऑडिटोरियम, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट(विधी महाविद्यालय रस्ता, पुणे )येथे हे चर्चासत्र झाले. या चर्चासत्रामध्ये भारत सरकारच्या सिक्युरिटी कौन्सिलचे सदस्य, पद्मश्री अमिताव मलिक, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. च्या सस्टेनॅबिलिटी हेड डॉ. सुनीता पुरुषोत्तम, नॅशनल कमोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्हज् एक्चेंज लि. चे उपाध्यक्ष अभिषेक राजुरकर सहभागी झाले. डॉ.अनघा पुरोहित यांनी या सत्राचे मॉडरेटिंग केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव यांच्या हस्ते ‘ एस आय : इंप्रिंट कन्फ्लुअन्स ‘ चे प्रकाशन झाले. ‘ सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज् ‘ संस्थेच्या दहा वर्षांच्या प्रवासाचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. या कार्यक्रमातील मान्यवर अतिथींचा सत्कार विश्वास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.डॉ.पूर्वा केसकर यांनी प्रास्ताविक केले. अपूर्वा कुलकर्णी यांनी ‘ एस आय इंप्रिंट ‘ पुस्तकाची माहिती दिली. कांचन सिधये यांनी सूत्रसंचालन केले.हृषीकेश कुलकर्णी , वैशाली पाटकर,पूजा ढोले, अमोल उंबरजे, शिवाली वायचळ यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘

‘ जागतिक तापमानवाढ ‘विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ह्रषिकेश कुलकर्णी यांनी आभार मानले. प्रदीप भार्गव म्हणाले, ‘ प्रतिवर्षी २ डिग्री सेल्सीयसने तापमान वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. रात्रीच्या तापमानापेक्षा दिवसाचे तापमान चौपट असणे ही पुण्यासाठी धोक्याची घंटा आहे.घाबरून न जाता सामूहिक प्रयत्न केले पाहिजे. ग्रीन फॅक्टरी हे उद्दीष्ट उद्योगांनी डोळयासमोर ठेवले पाहिजे. त्यातून बचतही होते.पर्यावरण संवर्धन हे उद्दीष्ट सर्वांच्या यादीत सर्वप्रथम असले पाहिजे .’

अमिताव मलिक म्हणाले, ‘ ग्लोबल वॉर्मिंग ही मानवाचीच करणी आहे. आपल्यालाच उपाययोजना केली पाहिजे.क्लायमेट चेंज हा निसर्गाची समस्या नसून आपली सर्वांची समस्या आहे. शहरांचा विकास करताना नैसर्गिक संसाधनांची काळजी घेतली पाहिजे.एनर्जी ( ऊर्जा ), एन्हॉयर्नमेंट ( निसर्ग ), एंपॉवरमेंट (सक्षमीकरण ) यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कार्बन उत्सर्जनाचे दुष्परिणाम शून्यावर आणण्यासाठी ( नेट झीरो ) प्रयत्न केले पाहिजेत.पुढील ३ दशके त्यासाठी महत्वाची आहेत.’ग्रीन इकॉनॉमी ‘ करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कार्बन उत्सर्जनावर कर लागू शकतो. त्याची तयारी ठेवली पाहिजे.हे उत्सर्जन कमी करणाऱ्यांना लाभ, इन्सेंटिव्ह दिला पाहिजे.

महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. च्या सस्टेनॅबिलिटी हेड डॉ. सुनीता पुरुषोत्तम म्हणाल्या, ‘ पर्यावरणपूरक बांधकामासाठी धोरण, कायदे येत आहेत.इमारती, घरांसाठी स्टार रेटींग येत आहे. कंपन्यांचेही प्रयत्न सुरू आहेत.आता आपण वेळेत पुढाकार घ्यायला हवा. कार्बन उत्सर्जन शून्यावर आणणे अवघड आहे, पण ते कमी करणे आवश्यक आहे ‘.
अभिषेक राजुरकर म्हणाले, ” कार्बन उत्सर्जन करणाऱ्या आणि हे उत्सर्जन कमी करणाऱ्या कंपन्यांसाठी जगात कार्बन मार्केट विकसित झाले आहे.विकसित आणि अविकसित देश कार्बन ट्रेडिंग सुरू करतील. डिजिटल सर्टिफिकेट च्या माध्यमातून कार्बन क्रेडीट दिले जाईल. त्यातून पर्यावरण संवर्धनाची जागरूकता निर्माण होईल ‘.
शाश्वत शहर विकासासाठी संवाद – पुणेकरांना भेडसावणाऱ्या शहरी समस्या, पर्यावरणविषयक जागरूकता, शाश्वत शहर विकास, शहरी जीवनाची गुणवत्ता अशा गोष्टींवर ऊहापोह करण्यासाठी या क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, सरकारी अधिकारी, स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी, नागरिक, इंजिनिअर्स, वास्तुविशारद, स्टेकहोल्डर्स यांना ‘ गोल्डन डॉयलॉग्ज ‘ या संवादमालेत आमंत्रित करण्यात येते. या संवाद मालिकेची वर्षभरात पाच सत्रे नियोजित करण्यात आली आहेत.ज्यामध्ये ‘रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन, पुणे शहरासाठी हवामान कृती आराखडा, डिझाइन स्पर्धेची भूमिका, शहरी इमारतीमध्ये रेटिंग सिस्टीमचे महत्व, पर्यावरणीय लँडस्केपिंग आणि शाश्वत शहरीकरण यासारख्या शहर विकासाशी निगडित विविध विषयांवर तज्ञांसोबत चर्चा केली जाईल.
सुवर्णमहोत्सवा निमित्त पुढाकार – आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी १९७३ साली सुरु केलेली ही आर्किटेक्चर प्रॅक्टिस आता जवळपास २५० जणांचे कुटुंब बनली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराचा प्रवास विश्वास कुलकर्णी यांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. व्यवसाय कायमच चोख आणि प्रामाणिकपणे करण्याबरोबर त्यांनी समाजोपयोगी काम करण्यावर भर दिलेला आहे. पुण्यातील या सर्वात जुन्या आणि मोठ्या कंपनीचा पुणे शहराच्या विकासात मोलाचं वाटा आहे. फक्त आर्किटेक्चर प्रॅक्टिस पासून सुरु झालेली ही फर्म आज शहर नियोजन, पर्यावरण, ग्रीन बिल्डींग्स, इंटेरिअर डिझाइन अशा विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर,जिल्हा परिषदेची नवी प्रशासकीय इमारत,परमार ट्रेड सेंटर अशा १ हजाराहून अधिक इमारतीचे आरेखन या कंपनीने केले आहे. ग्रीन होम्स प्लॅटिनम प्रमाणन व्ही के ग्रुप कडून केले जाते.विश्वास कुलकर्णी यांना त्यांच्या योगदानाबद्दल ग्लोबल रिअल इस्टेट काँग्रेसने ‘टॉपमोस्ट आर्किटेक्चर लीडर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
