
नांदेड| येथील सुप्रसिध्द नाट्यकलाकार प्रेरणा खंदारे यांचा माता रमाई यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण १९ मार्च रोजी तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात होणार असून दुसऱ्या सत्रात भूतान धम्माभ्यास सहलीवरुन परतलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा सत्कार होणार असल्याची माहिती येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.

ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुप्रसिद्ध नाट्यकलाकार प्रेरणा खंदारे यांचा माता रमाई यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग सादर केला जाणार आहे. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध राष्ट् भूतान धम्माभ्यास सहलीवरुन परतलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या धम्मसहलीत भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह पद्मावती हर्दडकर, दिगांबर हर्दडकर, शकुंतला सावते, शांताबाई खंदारे, आशालता शिंदे, सीताबाई हटकर, कांताबाई पांगरेकर, द्रौपदी कांबळे, रेखा सावते, रत्नप्रभा जाधव, सिताराम जाधव, श्रीराम जाधव, रोहिदास भगत, पद्मीनबाई भगत, सुनंदा चांदणे, भिक्षुक चांदणे, इंदिरा भोरगे, सुधा भवरे, प्रज्ञा बडोले, भीमराव बडोले, लक्ष्मीबाई गायकवाड, भीमराव गायकवाड, जीवीनंद गायकवाड, श्रेयस गायकवाड, प्रफुल्लता वाठोरे, शकुंतला नरवाडे, मीना नरवाडे, आळणे आई आदींचा समावेश होता.

याबरोबरच दिवसभरात परित्राणपाठ, सूत्तपठण, गाथापठण, त्रिसरण पंचशील, अष्टशील, दसशील ग्रहण, त्रिरत्न वंदना ध्यानसाधना, ध्वजारोहण, धम्मदेसना, आर्थिक दान, फलदान आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत तरी बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

