
नांदेड| भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतकर्यांचे मोठे योगदान आहे. कृषीप्रधान असलेल्या देशामध्ये शेतकर्यांना डी.लिट पदवी देवून सन्मानीत करण्यात यावे अशी मागणी रंगनाथ वाघ यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उध्दवराव भोसले यांच्या मार्फत राज्यपालांकडे निवेदन देवून केली आहे.

भारतात सुमारे 60 ते 70 टक्के लोक शेती करतात. 135 कोटी जनतेची शेतकरी भूक भागवितो. शेतकर्यांनी देशात व देशा बाहेर अन्नधान्य निर्यात केले. शेतकर्यांना जगाचा पोशिंदा समजले जाते. कोरोना सारख्या महामारीत शेतकर्यांनी भारताची आर्थिक व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी हातभार लावला. सध्या शेती हे शास्त्र झाले असून अतिशय शास्त्रोक्त पध्दतीने, अभ्यासपूर्ण शेती केली जात आहे.

म्हणून भारतातील शेतकर्यांचा सन्मान वाढवावा, इतवारांना शेती करण्या बाबत प्रेरणा मिळावी त्यासाठी मेहनती व नाविन्यपूर्ण शेती करणार्या शेतकर्यास कृषी विद्यापीठ तसेच इतर विद्यापीठाकडून डी.लिट ही मानद पदवी बहाल करून त्याचा यथोचित्त सत्कार करावा जेणे करून नविन पिढीला सुध्दा शेतीबद्दल आवड निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे कुलगुरूंनी शेतकर्यांना डी.लिट पदवी देण्या संदर्भात तरतूद करावी व संबंधित मागणी राज्यपालांकडे पोहचवून सर्व विद्यापीठाने शेतकर्यांना डी.लिट पदवी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रंगनाथ वाघ, सौ.कमल वाघ, शिवदास होट्टे, अशोक कदम आदिंची उपस्थिती होती.

