
नांदेड| येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय दवाखाना विष्णुपूरी नांदेड येथील रुग्णांच्या होणार्या प्रचंड गैरसोयीच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेडच्या वतीने अधिष्ठाता पी.टी. जमदाडे यांना रुग्णांसंबंधी विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सदर मागण्या मान्य न झाल्यास रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदीप मांजरमकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष माधव चित्ते, युवा जिल्हाध्यक्ष राहुल चिखलीकर, महासचिव नागराज ढवळे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष रेड्डी, जिल्हा सचिव रवींद्र सोनकांबळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, रिपब्लिकन ऑटो सेनेचे नरसिंग पुसा व इतर उपस्थित होते.

