नवीन नांदेड। युवा गुप सिडकोच्यावतीने शिवजन्मोत्सवा निमित्य दि ११ मार्च रोजी ” चला हवा येऊ द्या !, काँमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातील हस्य कलाकरासह संगीत , नृत्य , पोवाडा यांची हस्य विनोदाची मनोरंजनात्मक सोहळयाला परिसरातील नागरीकासह ग्रामीण भागातील महिला पुरुषाची उपस्थिती मोठया संख्येने उपस्थिती होती या सोहळ्याचे आयोजन युवा गुपचे संस्थापक अध्यक्ष तथा युवक काँग्रेस शहरचे जिल्हाउपाध्यक्ष सतिश पाटील बस्वदे यांनी केले होते.
सिडको येथील युवा गुपच्यावतीने छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्याने जिजाऊ सृष्टी सिडको मैदान येथे दि ११ मार्च रोजी सायकांळी ६ वाजता संगीत , नृत्य आणि हास्य विनोदाची मनोरंजनात्मक मेजवाणीचे सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे . या विनोदाच्या कार्यक्रमात ” चला हवा येऊ द्या ” आणि ” काँमेडीची बुलेट ट्रेन “यातील कलाकार अंकुश वाढवे , अशिष पवार , जयवंत भालेकर ,अंशुमन विचारे , कमलाकर सातपुते , नम्रता सतिश कासेवार व शाहीर गौतम पवार यांच्या शाहीरी जलसा व कथक नृत्य अर्पिता चाफे लावणी नृत्य भिमकिर्ती कांबळे यांनी सादरीकरण केले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आ.अमर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले तर,या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री डि.पी.सावंत,आ.अमर राजुरकर, आ.मोहनराव हंबर्डे, उपमहापौर अब्दुल गफार, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, सतिश देशमुख,काँग्रेसचे पक्ष पक्षप्रवक्ते संतोष पांडागळे,जिल्हा अध्यक्ष पप्पु पाटील कोढेकर, विठ्ठल पावडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे, नगरसेवक किशन कल्याणकर,संदीप सोनकांबळे,उदय देशमुख, सिध्दार्थ गायकवाड,संजय इंगेवाड, सौ. ललिता बोकारे,सौ.करुणा जमदाडे, सौ. वैजयंती गायकवाड, विनोद कांचनगिरे,देविदास बसवदे,पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, नाजीमसहचे संचालक राजेश पावडे, बापूसाहेब कौडगावकर, विवेक राऊतखेडकर,नितीन झरीकर यांच्या सह आजी माजी लोकप्रतिनिधी व काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती, यावेळी कलाकार यांनी सुमारे दोन तास उपस्थित नागरीकांना हास्य करून सोडविले.
यावेळी माजी पालकमंत्री डि. पी. सांवत यानी शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्ये विचार अंगीकृत करावे असे आवाहन केले तर माजी आमदार अमर राजूरकर यांनी सामाजिक माध्यमातून युवा गुप्रचे अध्यक्ष सतिश बसवदे व पदाधिकारी कार्य करत असल्याचे सांगितले, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबडे यांनी गत दहा वर्षांत युवा गुप्र यांनी सामाजिक माध्यमातून केलेले कार्य उलेखनीय असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे तर प्रास्ताविक सतिश बसवदे यांनी केले, हा सोहळा यशस्वीतेसाठी युवा गुप्र पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.