
ढाणकी। हिमायतनगर रेल्वे स्टेशन वरुन गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या काळात बंद असलेली नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत आतापर्यंत सुरू करण्यात आली नाही. ती नागपूर पर्यंत वाढवावी अशी मागणी हेमंत पाटील यांच्याकडे माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळानेही केली आहे.

मुंबई नांदेड नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात होती. परंतु कोरोणा च्या काळात बंद करण्यात आली असून, ती गाडी अदीलाबाद पर्यंत जाते. नागपूरला न जाता परत अदीलाबाद वरूण मुंबई साठी रवाना होते. नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात असल्याने प्रवाशांना नागपूर चंद्रपूर देवीचे दर्शन जाण्यास सोईचे होईल. वर्धाला सेवाग्र हे रुग्णालयात रुग्णा जाण्यासी सोईकर होणार आहे. नागपूर जाण्यासाठी विदर्भातील ढाणकी, उमरखेड, महागाव, बिटरगाव, फुलसावंगी, या भागातील जनतेला सोयीची होती.

हि नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे खा.हेमत पाटील याच्या कडे केली. नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत वाढविण्यात यावी. यासाठी ढाणकी येथील माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष शेख इरफान सचिव हिरासिह चव्हाण ठाकुर, उपाध्यक्ष नाथा पाटील यांनी केली आहे.

