
नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२१ च्या झालेल्या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.

यामध्ये नवीन नांदेड सिडको भागातील रहिवासी असलेले तथा जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरी ता.मुखेड जि.नांदेड व्दारा संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च विद्यालय, सिडको नांदेड शाळेचे माजी विद्यार्थी बालाजी शिवाजी राव कदम मंगलसांगवी रा.काकांडी (दरा)यांनी राज्यात बारावा तर जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवून क्लास वन अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ, उमरदरी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव नागोराव जाधव व संस्थेचे उपाध्यक्ष तथा शाळेचे उपमुख्याध्यापक रवि शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते शिवाजी विद्यालयात बालाजी कदम व त्याचे वडील शिवाजीराव कदम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रा व्ही के हंगरगेकर पर्यवेक्षक एन एम भारसावडे, नरसिंह विद्या मंदिर प्रा. शाळेच्या मुख्याद्यापीका सौ.व्ही. एन.एकुंडवार व सहशिक्षक एस.आर. बिरगे,वसंत वाघमारे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

