हिमायतनगर, असद मौलाना। हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात आसलेल्या ग्रामीण रुग्णालयावर दोन गटात झालेल्या भांडणात दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी जमावातील 15 ते 16 लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमायतनगर शहरातील एका लग्नसोहळा शांततेत झाल्यानंतर दोन गटात कोणत्यातरी कारणावरून दि.13 मार्च रोजी दुपारी वाद निर्माण झाला. तो वाद शहरातील ग्रामीण रुग्णालयात पोचला त्या जमावापैकी काहींनी दुपारी 4 वाजेच्या सुमारास येथील ग्रामीण रुग्णालयावर विटासह दगड फेकत असल्याचा प्रकार हिमायतनगर ठाण्याचे पोलीस अंमलदार नंदलाल भुरालाल चौधरी हे एका गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण रुग्णालय गेले होते. यावेळी लखन व्यंकटी गायकवाड, गोविंद चिमन्नाजी गायकवाड, अजय मेरटकर, पिराजी बेडके, संतोष गायकवाड, सिनु भुराजी पवार, लक्ष्मण चव्हाण, दादाराव चव्हाण, दिलीप चव्हाण, अक्षय बाबूराव देवकर, शंकर चव्हाण आणि त्यांच्यासोबत इतर चार ते पाच जणांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.
यावेळी पोलिसांनी त्यांना दगडफेक करण्यास मज्जाव केला असता जमावातील काहींनी पोलिसांनाच धमकी दिली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांच्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 60/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 143, 147, 148, 149 सह कलम 135, मुंबई पोलीस कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अधिनियम कलम 3 आणि 7 नुसार दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक बीरप्पा भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री पाटील हे करत आहेत.