
हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यातील मौजे वाळकी बु. येथील माजी सैनिक यांच्या विधवा पत्नी गयाबाई खेमाजी शिंदे यांना सरकारच्या नियमानुसार 1.84 आर जमीन उर्वरित आयुष्याच्या उदरनिर्वांसाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार ही जमीन भेटली होती. परंतु येथील प्रदीप देसाई देशमुख या व्यक्तीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संगणमत करून वाळकी बु. येथील सैनिकांच्या हक्काची जमीन बळकवल्याचा आरोप येथील उपोषण कर्त्यांनी केला आहे जमीन हडपणाऱ्या व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे .

याबाबत सविस्तर वृत असे की, हदगाव तालुक्यातील मोजे वाळकी बुद्रुक तालुका हादगाव जिल्हा नांदेड येथील माजी सैनिकास मिळालेली जमीन ही प्रदीप देसाई देशमुख राहणार वाळकी बुद्रुक यांनी परस्पर आपल्या नावावर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आज तहसील कार्यालय हदगाव येथे माजी सैनिक यांच्या विधवा पत्नी गयाबाई खेमाजी शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांचे पती भारतीय सेनेमध्ये काम करत होते. भारतीय सेनेमध्ये काम करत असताना ते निवृत्त झाले होते भारत सरकारकडून त्यांना वाळकी बुद्रुक या गावांमध्ये शेत गट नंबर 48 डी मध्ये १.७६ आर जमीन दिली होती.

जमीन मिळाल्यानंतर सदरील जमीन ही सैनिकांच्या पत्नी गयाबाई शिंदे ह्या वाहत होत्या . परंतु येथील प्रदीप देसाई देशमुख राहणार वाळकी बुद्रुक यांनी खोट्या कागदपत्र आधारे कोणत्याही नोंदणीकृत दस्तऐवज अखेरीस नसताना तलाठी व मंडळाधिकारी यांना हाताशी धरून सैनिकाच्या नावावरची शेतजमीन ही बनावट कागदपत्र आधारे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संगमत करून खोटा व बनावट फेरफार करून हडप केली असल्याची येथील उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.

उपोषणकर्त्या ह्या अशिक्षित असल्यामुळे आणि वयोवृद्धाचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्यांच्या नावावरील जमीन खोट्या दस्तऐवजा आधारे त्यांच्या नावावर करून घेतली असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे. तलाठी मंडळ अधिकारी व प्रदीप देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी आज तहसील कार्यालय हदगाव येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.

