
हिमायतनगर। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “महात्मा फुले यांचे शेती विषयक विचार व सद्यस्थिती” या विषयावर एक दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ उज्ज्वला सदावर्ते ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुदखेड येथून आलेले प्रा. डॉ. दत्ताची मेहत्रे हे लाभले होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून नॅक समन्वयक डॉ. गजानन दगडे, इंग्रजी विभागातील संयोजन समितीचे प्रा. प्रवीण सावंत, प्रा. एम. पी. गुंडाळे, प्रा. मुपडे आदी उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. तद्नंतर मंचावरील मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय संयोजक प्रा. प्रवीण सावंत यांनी करून दिला.

प्रमुख व्याख्याते यांनी महात्मा फुले यांच्या शेतीविषयक विचार व सद्यःस्थिती विषयावर मत मांडतांना शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या व त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर मत मांडून महात्मा फुले यांचे शेतीविषयक विचार किती प्रासंगिक होते. यावर प्रकाश टाकला. त्यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तर आभार प्रा. एम. पी. गुंडाळे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचा संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

