
पुणे| ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘जाऊ देवाचिया गावा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संतरचनांचे व्हायोलिनवरील सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. संकल्पना आणि निरुपण डॉ वंदना बोकील-कुलकर्णी यांचे असून या संतरचना व्हायोलिनवर अनुप कुलथे सादर करणार आहेत.

रविवार , १९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.रोशन चांदगुडे (तबला),प्रणय सकपाळ (पखवाज),चंद्रकांत चित्ते(की बोर्ड ),धनंजय साळुंके (ताल वाद्य ) हे साथसंगत करणार आहेत.कलादिग्दर्शन कपिल जगताप यांचे आहे. ‘मोगरा फुलला ‘ पासून ‘अवघा रंग एक झाला’ पर्यंत अनेक संतरचना व्हायोलिनवर सादर केल्या जाणार आहेत. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५४ वा कार्यक्रम आहे .

