तामसा/हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यातील मौजे कंजारा खुर्द येथील शेतकरी यांना गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा मिळत असलेले अनुदान जमीन नाही म्हणून बंद केले असल्याचे निवेदन येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिले आहे. निवेदन देऊन अनुदान न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर सामूहिक आमरण उपोषणास बसणार असल्याचे नमूद केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, हदगाव तालुक्यातील मौजे कंजारा खुर्द येथील असंख्य शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नसून काही शेतकऱ्यांना ११ हप्ते मिळाले आहेत. व पुढील हप्ते मिळाले नाहीत व सदरील मिळणारे अनुदान शेतकऱ्यांकडे जमीन नाहीत म्हणून मिळत असलेले अनुदान बंद केले आहे. येथील शेतकरी बांधव गेल्या एक वर्षापासून पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे याबाबत वेळोवेळी तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी विनंती अर्ज केले आहेत.
तरीसुद्धा या विनंती अर्जावर येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मागणी अध्याप पर्यंत कोणतीही मागणी मान्य न केल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसात या मागणीचा विचार न केल्यास पुढील काळात हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर तारीख देऊन आमरण उपोषणास बसणार असल्याचे येथील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन तहसीलदार यांना कळवले आहे. यावेळी अशाबाई तवर , दिगंबर तवर, वैभव तवर, शिवाजी चव्हाण, नागोराव तवर, संगीताबाई तवर, संभाजी तवर, सुरेखाबाई तवर, भाऊराव तवर, सखाराम शेळके, भगवान शेळके, ओम प्रकाश तवर, विजय तवर, राहुल शेळके,इत्यादी असंख्य शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.