Sunday, April 2, 2023
Home क्रीडा नांदेडची सुवर्णकन्या सृष्टी पाटील जोगदंड सह भारतीय धनुर्वीद्या संघ एशिया कप स्पर्धेसाठी तैवानला रवाना -NNL

नांदेडची सुवर्णकन्या सृष्टी पाटील जोगदंड सह भारतीय धनुर्वीद्या संघ एशिया कप स्पर्धेसाठी तैवानला रवाना -NNL

by nandednewslive
0 comment
नांदेड। वर्ल्ड आर्चरी संघटनेच्या अंतर्गत तैवान येथे आयोजित एशिया कप स्टेज वन वर्ल्ड रँकिंग स्पर्धेसाठी नांदेडची सुवर्ण कन्या तथा मराठवाडा एक्सप्रेस कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंड  दिनांक १३ मार्च रोजी भारतीय संघासमवेत तैवानला रवाना झाली .रिकव्हर प्रकारात खेळणारी सृष्टी महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू असून तिच्या आयुष्यातली पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ती खेळत आहे .
साई सोनीपत येथे आयोजित निवड चाचणी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत तिने वर्ल्ड आर्चरी असोसिएशनच्या अंतर्गत तैवानमध्ये होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी आपली योग्यता सिद्ध केली भारतीय संघामध्ये रिकवर  गटांमध्ये गुरमेर गरेवाल ( चंदीगड) सृष्टी जोगदंड  (महाराष्ट्र ) आदिती जयस्वाल ( कलकत्ता ) तनिषा वर्मा  (चंदिगड ) मुले पार्थ साळुंखे ( महाराष्ट्र) राहुल दिल्ली ,  रामपाल चौधरी ( जयपूर) जुगल सरकार  (कलकत्ता ) तर कंपाऊंड प्रकारात प्रगती दिल्ली ,प्रणित कर चंदिगड  ,ऐश्वर्या शर्मा गाझियाबाद  ,साक्षी चौधरी गाजियाबाद  ,कंपाउंड मुले प्रथमेश जावकर ( महाराष्ट्र ) प्रियांश  (गाझियाबाद ) पवन घाट  (जयपुर ) व्यंकट आदरी कुंडू  (विजयवाडा ) यांची निवड झाली तर प्रशिक्षक म्हणून राम अवधेश , अनुराग कमल , विकास अजित यांची तर प्रमुख व्यवस्थापक म्हणून संजीवा कुमार सिंग फिजिओथेरपीस्ट डॉ . साधना गौतम  ,सायकॉलॉजिस्ट डॉ .सोनी जॉन हे संघासमवेत असणार आहेत .
दिल्लीतून रवाना झालेल्या या संघाचे अभिनंदन करीत भारतीय धनुर्वीधा संघाचे  महासचिव  प्रमोद चांदुरकर  ,ऑलिंपिक प्रशिक्षक रविशंकर सर , ब्रिजेश कुमार  ,प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड प्रशिक्षिका पिंकी राणी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण  ,नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  ,स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे  , डॉ . अविनाश बारगजे, मिलींद पठारे, मास्टर विजय कांबळे ,अशोक दुधारे प्राचार्य एनसी अनुराधा  ,क्रीडा उपसंचालक विजय संतान महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अँड प्रशांत देशपांडे  ,सोनल बुंदिले  ,प्राचार्य मनोहर सूर्यवंशी  ,गणाचार्य मठाचे मठाधिपती . डॉ विरुपाक्ष महाराज  ,जनार्दन गोपीले डॉक्टर हंसराज वैद्य  ,बाबू गंधपवाड आंतरराष्ट्रीय सर्प तज्ञ डॉ  दिलीप पुंडे ,फत्तेसिंह पाटील ( भापोसे)प्रलोभ कुलकर्णी  ,विक्रांत खेडकर  जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार , शिवकांत देशमुख  ,संतोष कंकावार माजी जिल्हा क्रीडा अधिकारी आनंद बोबडे  ,गंगा लाल यादव , राजेश जांभळे जिल्हा धनुविद्या संघटनेचे कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर नांदेड तालुका आर्चरी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास भुसेवार , संजय चव्हाण  ,अभिजीत मुन्ना कदम डॉ . राहुल वाघमारे प्राध्यापक संजीव डोईबोळे  ,अभिजीत दळवी नारायण गिरगावकर  ,राष्ट्रपाल नरवाडे सरदार अवतार सिंग रामगडीया  ,अनिल बंदेल, गजानन फुलारी, बाबुराव खंदारे , प्रशांत आसमाने ,मालू कांबळे , राजेंद्र सुगावकर उद्धव जगताप  ,किशोर पाठक  ,सुशील दीक्षित शिवाजी पुजरवाड , नंदकिशोर घोगरे , ज्ञानोबा जोगदंड  ,जगदीश जोगदंड  , संजय चव्हाण ,सुभाष नावंदे  ,मुरलीधर रेड्डी नेताजी जाधव  ,गुरुनाथ काळे गफार पठाण, अँड अरुण फाजगे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!