
हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यातील मौजे कवाना हे श्री संत नंदी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

तालुक्यातील अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री संत नंदी महाराज यांचा उल्लेख केला जातो .परंतु येथील लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांचे गावाकडे लक्ष नसल्यामुळे गावातील लोकांना व भाविकांना ये जा करण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत. खरंतर बरडशेवाळा ते कवाना हा दोन किलोमीटर चा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे येथील नागरिकांना व विद्यार्थी विद्यार्थिनींना ये जा करण्यासाठी अतिशय खडतर प्रवास करावा लागत आहे .

याकडे प्रशासन व ग्रामपंचायत कवाना लक्ष देईल का असे जनमानसात प्रश्न निर्माण होत आहेत.कवाना हे गाव पूर्वी बाजारपेठ असल्यामुळे या गावाला चांगला नावलौकिक आहे तसेच येथे सावित्रीबाई फुले विद्यालय असल्यामुळे येथील शेकडो विद्यार्थी शाळेला ये जा करतात परंतु त्यांना हा प्रवास खूपच खडतर असल्याचे दिसून येत आहे.

आणि शासकीय ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय बरडशेवाळा येथे असून इमर्जन्सी पेशंट व डिलिव्हरी पेशंट दवाखान्यात जात असताना या रस्त्यामुळे काही पेशंटला आपला जीव गमवा लागत आहे मात्र प्रशासन या रस्त्याकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न कवाना व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे.

