उस्माननगर, माणिक भिसे। मारतळा ता.लोहा येथील जिल्हा परिषद शाळेचा वृक्ष वाचनालय उपक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे नवीन उपक्रमाची सुरुवात शनिवारी रोजी सकाळी शालेय समिती व उपक्रमशिल शिक्षक रवी ढगे यांच्या संकल्पनेतून आनोखा वृक्ष वाचनालय नावाने नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.इतर शाळेपुढे आदर्श घेण्यासारखा उपक्रम हाती घेण्यात आला.
त्यात प्रामुख्याने बंदीस्त खोलीत न बसता, मोकळ्या हवेत फळा खडू ऐवजी …झाडांनाच पुस्तकेच लागली तर किती मजा येईल…., अशी अनोखी संकल्पना सुचली व ती पुढे नेत शाळा परिसरात झाडाच्या सावलीत वाचनालयातील सर्व पुस्तके यात मराठी, हिंदी, व इंग्रजी तिन्ही भाषेतील पुस्तक ते परिसरात असलेल्या झाडांना लटकवली जातात. आवडी प्रमाणे हवी ती पुस्तके घेऊन झाडाखाली बसून मुले पुस्तके वाचण्याचा आनंद घेत आहेत.
ज्या पद्धतीने झाडांवर पक्षांची किलबिल असते. त्याच प्रकारे झाडाखाली विद्यार्थ्यांची वाचनाची किलबिल सुरू आहे . या अनोख्या उपक्रमामुळे विद्याथ्र्यांना वाचनाची आवड निर्माण होईल, … पण सध्या येथील मुले आनंदाने या वृक्ष वाचनालयामध्ये वाचनात मग्न होताना दिसतात. वृक्ष वाचनालयाचे नियोजन पाचवीची विद्यार्थी सोनाक्षी भोग, सोहम सोरटे, वेदिका गिरी, चैतन्य ढेपे, साईप्रसाद बाघमारे, दैवत गुंडेकर मधुरा शिंदे, श्रावणी येडे, माहीम पठाण आदी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. या सर्वांचे शालेय समिती अध्यक्ष आनंद ढेपे, व मार्गदर्शक तथा उपसरपंच भास्कर पाटील ढगे, मुख्याध्यापक व्यंकट मुगावे आदींनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे शिक्षणप्रेमी यांच्या कडून अनोखी उपक्रमाबद्दल अभिनंदन होत आहे.