
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा या एप्रिल महिन्यापासून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दिकी यांच्या उपस्थितीमध्ये शिष्टमंडळाने परीक्षा नियंत्रक नेटके यांना परीक्षा पुढे ढकलाव्या अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा दिला.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने एप्रिल महिन्यापासून उन्हाळी सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे परंतु बहुतांश महाविद्यालयांचा अभ्यासक्रम अजून पर्यंत पूर्ण झालेला नसून तसेच प्रथम सत्राच्या परीक्षा या 16 जानेवारी पर्यंत चालू होत्या आणि द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम त्यानंतर 20 जानेवारीपासून चालू झाला होता आतापर्यंत विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयाच्या अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही विद्यापीठाने 18 एप्रिल 2023 रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एप्रिलमध्ये परीक्षा देण्याच्या निर्णयाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे तसेच त्यांचे भविष्य हे अंधारमय झाल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या परीक्षा या विद्यापीठ प्रशासनाने घेऊ नये असा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी आहे.जर परीक्षा एप्रिलमध्ये घेतला तर बहुतांश विद्यार्थी हे नापास होण्याची भीती आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची सुद्धा भीती आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या परीक्षा ह्या काही काळासाठी पुढे ढकलाव्या व ज्या महाविद्यालयाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना त्या महाविद्यालयाला देण्यात याव्या.

अशा स्वरूपाचे आज निवेदन परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री नेटके यांना देण्यात आले या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने येथे आठ दिवसांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात करण्यात येईल असा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दिकी, कार्याध्यक्ष प्रसाद पवार, अमित सिंग सुखमणी, सदाशिव पप्पुलवाड, मोहम्मद असलाम ,मोहसीन खान , विजय गायकवाड ,युसुफ अन्सारी ,अफरोज खान ,मयूर जोंधळे ,कृष्णा पावडे ,निखिल हटकर ,निखिल गायकवाड, साई ठाकूर, सोनू कदम, तुषार पाटील ,अभिषेक जोगदंड इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.

