नांदेड। साईबाबांच्या दर्शनासाठी जाणारी उमरी ते शिर्डी पदयात्रा आज दि १६ मार्च २०२३ रोजी नांदेड शहरात दाखल होणार असून या भक्ती जागृत करणाऱ्या दिंडीचे गुरुनगरीत ठीकठिकाणी भव्य स्वागत केले जाणार आहे.
या शिर्डी पदयात्रेला १४ मार्च रोजी उमरीतून सुरुवात झाली. जवळपास २०० साई भक्त या पदयात्रेत सहभागी झाले अहेत. संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळाच्या वतीने १४ वर्षापासून उमरी ते शिर्डी हि पदयात्रा काढण्यात येते. जवळपास ४५० किलो मीटरची ही पदयात्रा रामनवमीला शिर्डीत पोहोचणार आहे आणि तेथे साई भक्तांच्या वतीने रामनवमी उत्सव साजरा केला जातो. 16 मार्च 2023 रोजी सकाळी ११ वाजता शिवाजीनगर येथील हनुमान मंदिर मधे यात्रेचे स्वागत होणार आहे.. यात्रेच्या स्वागताला सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती नांदेड मर्चंट कोऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष दिलिप कंदकुर्ते व नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी केली आहे..
या पदयात्रेत संस्थापक अध्यक्ष पंडित बेंबरे पाटील, कार्याध्यक्ष अशोक मामीडवार,मुख्य प्रवर्तक विष्णू अट्टल, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष गोपाळ राठोड, रथावरील पुजारी विवेक काचावार, उद्धव मामडे, माजी नगराध्यक्ष सुभाषपेरेवार, पोलीस पाटील दत्तात्रेय वारेवार, शिवाजी हेमके, दामोदर लाभशेटवार, गजानन श्रीरामवार, रुपेशकुमार श्रीरामवार,विठ्ठल मुक्कावार, मोरे मामा, परमेश्वर मुदिराज, संदीप लाभशेटवार, प्रशांत जोंधळे, सदानंद खांडरे, भगवान असावा, रमेश हिरडगावकर, महेश नगनूरवारसह अनेक साईभक्त सहभागी झाले आहेत.संत कवी दासगणू महाराज यांच्या नावाने निघालेली पदयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपास आली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिराचे संत कवी दासगणू महाराज हे जवळपास ३५ वर्ष अध्यक्ष राहिले आहेत. दासगणू महाराजांनी साई चरित्रावर मोठे लिखाण केले आहे. या गुरु शिष्याच्या नात्याला या पदयात्रेच्या रूपाने अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.