
हदगाव, शे.चांदपाशा| देशातील सर्वात मोठी विश्वसनीय स्टेट बँक ऑफ इडीया म्हणून गणल्या जात असलेल्या हदगाव शहराच्या शाखेत तात्कालिक कर्मचाऱ्याने काही ग्राहकांच्या खात्यातील १८ लाख ६४ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. हा गंभीर प्रकार हदगाव शहराच्या येथील एसबीआय बँकेच्या शाखेत घडला असताना माञ याची चौकशी कासव गतीने होत होती. जेव्हा काही वृतपञांनी या घटनेची दखल घेतली तेव्हा कुठे संबंधित कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एस बीआय बँक शाखा व्यवस्थापक अभिषेक विरेंद्रसिंह रोहतगी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १६ जून २०१९ ते ८ जानेवारी २०२१दरम्यान एसबीआय हदगावच्या शाखेत कार्यरत कर्मचारी गजानन कोंडीबा पिंपरे याने हा प्रकार केला आहे. स्वतःकडे क्रेडीट व्यवस्थापक हे पद असताना ११ नोव्हेंबर २०१५ ते २ जून २०२२ दरम्यान बॅकेचे खातेदार सोनबा कदम यांच्या खात्यातून ११ लाख ५७ हजार रुपये, कोंडबा आमदरे यांच्या खात्यातून ४ लाख १९ हजार ९०० रुपये आणि राजसबाई कोंडवा कदम यांच्या खात्यातून २ लाख ८७ हजार ५०० रुपये स्वतः उचलून घेवून १८ लाख ६४ हजार रुपयांचा काढुन घेतले आहेत.

हदगाव पोलिसांनी या प्रकरणी गजानन कोंडीबा पिंपरेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भोसले हे यांच्याकडे देण्यात आला आहे.

बँकेच्या वरिष्ठ अधिका-यानी ग्राहकांची शंका दुर करावी
हदगाव शहरात स्टेट बँक आँफ इंडीया ही पुर्वी ची (एसबीएच) ही फार जुनी राष्ट्रीय बँक असुन या बँकेचे तीन ते साडेतीन लाख खातेदार आहेत. यामध्ये अनेकांच्या प्रचंड प्रमाणात ठेवी असुन, या घटनेमुळे या बँकेच्या शाखेच्या विश्वासार्हता वर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. या बँकेचे वरिष्ठ अधिका-यानी दाखल घेऊन या बाबतीत खातेदारांच्या शंकेचे निरासन करावे अशी खातेदारांची मागणी होत आहे.

