
पुणे। ‘कलावर्धिनी’संस्था आणि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनस् (आय सी सी आर) यांच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘चैत्रपालवी’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

नृत्य गुरु पं.मनीषा साठे(कथक),आणि विदुषी मंजिरी आलेगावकर (शास्त्रीय गायन) यांचा सहभाग या कार्य्रक्रमात असणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र महिन्याचे आगमन या दिवशी होत असल्याचे औचित्य साधून हा सांस्कृतिक कार्यक्रम आखण्यात आला आहे.

बुधवार , २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५५ वा कार्यक्रम आहे .

