
अर्धापूर| येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या कार्याची दखल घेऊन दुबई येथे त्यांना सन्मानित करण्यात आले,त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यानी पंचायत समितीच्या सभागृहात त्यांचा सत्कार केला.

साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्यासह अनेकांना दुबई येथे खलीफा बिल्डींगनजीकच्या सभागृहात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चौधरी हे दुबई हुन परत आल्यावर येथील सामाजिक कार्यकर्ते जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, अध्यक्ष गुणवंत विरकर,सचीव उध्दवराव सरोदे, उपाध्यक्ष शंकरराव ढगे,आनंद मोरे,व्यंकटी गोरे, संतोष कपाटे,गजानन मेटकर,प्रा.मुख्तारोदीन काजी,शेख शकील,अॅड गौरव सरोदे,प्रदीप हिवराळे,कैलास भुस्से यांनी सत्कार केला. यावेळी सत्काराला चौधरी यांनी अनुभव विषद करुन ॠण व्यक्त केले.यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

