तामसा/हदगाव। येथील नटराज जिनिंग कॉटन प्रायव्हेट लिमटेड. चे वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हाणीझाली नाही.
हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या तामसा येथील नटराज कॉटन प्रायव्हेट लिमिटेड चे वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे यात येथील लोखंडी शेडचे पूर्णपणे वाऱ्याने उध्वस्त झाले आहे.. या शेड खालील कापसाचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसत आहे.
वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठे असलेल्या तामसा येथे आज वादळी वारे व पावसामुळे नटराज जीनींगचे पत्रे मोडून पडल्यामुळे अडीच हजार क्विंटल कापूस पाण्यामध्ये गेला आहे. तसेच 80 लाखाचे शेड मोडून पडले आहे यात कुठलीही जीवित हानी झाली नाही असे येथील जिनींगच्या मालकाने सांगितले आहे.