
नांदेड| राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झाले आहे. केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून बागाच्या बागा जमीनदोस्त झाल्यात आहेत. झालेले नुकसान भरपाई होणे अशक्य आहे.

शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये आसू वाहत आहेत. एकीकडे पिकाला योग्य भाव नाही ,दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे ,अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी. राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे पंचनाम्यामध्ये वेळ न घालवता सॅटेलाईटच्या माध्यमातून नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करावी व शेतकऱ्याला आधार देण्याचे काम करावे.

