
नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील भायेगाव येथे १६ मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी गारपिट पावसामुळे शेतीचे नुकसान होऊन अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडुन गेली तर काही घरावर वृक्ष पडल्याने नुकसान झाले असून तात्काळ नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांच्या कडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली असून पंचनामे करून मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

१६ मार्च रोजी सायकांळी पाच ते साडेपाच दरम्यान अचानक आलेल्या वारे वादळ पावसामुळे ग्रामस्थ यांच्यी धावपळ सुरू झाली तर ग्रामस्थ यांच्या अनेक घरावरील पत्रे उडुन गेली आहे तर काही ठिकाणी मोठ मोठये वृक्ष उखडून पडली आहे, मुख्य रस्ता व अंतर्गत भागातील वृक्ष घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. तर गावातील विधुत पुरवठा करणारे पोल वाक्याला गेल्याने विज पुरवठा खंडीत झाला असुन गावातील जवळपास पन्नास खांबावरील तारा अनेक ठिकाणी लोंबकळलया आहेत.

तात्काळ महावितरण विभागाने दुरूस्ती करून विज पुरवठा सुरळीत करावा व अचानक आलेल्या गारपिट पावसामुळे शेतकरी बांधव यांच्या शेतातील गहू , ऊस यासह अनेक पिके तर , भाजीपाला पिकाचे नुकंसान मोठया प्रमाणात झाले असून संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांच्या कडे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

आज सांयकाळाचा अचानक झालेल्या गारपिट व वादळी पावसामुळे शेतकरी बांधवासह ग्रामस्थ याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून भायेगाव ग्रामपंचायत कार्यालय चे ग्रामसेवक एस. एस. वाकोरे यांनी नुकसान ग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली आहे.

