
नांदेड/लोहा।नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गोळेगाव ( पऊ ) येथील अवकाळी पावसामुळे दुसऱ्याच्या घरावरचे पत्रे माझ्या घरावर आल्याने माझा चाळीस क्टिटल कापुस पाण्याने भिजला आसुन शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत दयावी आशी मागणी शेतकरी किरण देशमुख यांनी केली आहे.

१६ मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळ वारे गारपिट पावसामुळे विक्री साठी ठेवलेल्या शेतकरी किरण देशमुख यांच्या शेतातील घराचे पत्रे उडुन सुमारे चाळीस किवंटल कापूस ओला चिंब झाला आहे तर च एकाच्या घराची भित पडुन मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई मिळून दयावी आशी मागणी केली आहे.

