
नवी दिल्ली। देशाच्या स्वांतत्र्यसाठी आपले अमूल्य जीवनाची बलिदान दिलेली महान स्वांतत्र्यवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा बलिदान दिनानिमित्त जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु श्री ओम हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात गुरुवार दि.२३ मार्च २०२३ रोजी पंजाब राज्य, पाकिस्तान सरहद्दीवर शहीद भगतसिंग यांचे जन्मस्थानी खडकर कलान येथे ऐतिहासिक देश भक्ती कार्यक्रम आयोजित केला आहे.

त्यानिमित्त बुधवारी सकाळी आळंद तालुक्यातील जय भारत माता मंदिर येथून यात्रेला सुरुवात झाली आणि कलबुर्गी, कमलापुरा, हुमनाबाद, बंगला मार्गे उमरगा, तुळजापूर, सोलापूर,पंढरपूर, भिगवन मार्गे पुणे येथे येणार आहे. मुंबई, नाशिक मार्गे मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या विविध राज्यांतून ही यात्रा जाणार असून निस्वार्थ भावनेने, देशभक्तीचा संदेश देशभर घेऊन जाणारी ही देशभक्ती यात्रा आहे. या देशभक्ती यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातील भाविक शेकडो वाहनांसह सहभागी झाले आहेत. पुढे गुजरात , मध्यप्रदेश, राजस्थान हरियाणा या राज्यातील हजारो देशभक्त या देशभक्ती यात्रेत सामील होणार आहेत.

जीव महत्वाचे नाही, देश महत्वाचे आहे. देहपुजा करण्यापेक्षा प्रथम देश पुजा केले पाहिजे म्हणून समस्त देश बांधवांना हे शूरवीरांच्या बलिदान देश बांधवांच्या मनात सदास्मरणार्थ राहावें या प्रमुख उद्देशाने सदगुरु हवा मल्लिनाथ महाराजांनी अमर बलिदान दिनानिमित्त पंजाब राज्य, पाकिस्तान सरहद्दीवर शहीद भगतसिंग यांचे जन्मस्थानी खट कर कलान येथे आयोजित केला आहे. 23 मार्च रोजी सकाळी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू व देशातील इतर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू व इतर शहिदांच्या वारसांचा सन्मान व गौरव करण्यात येणार आहे . देशभक्तीपर विविध मान्यवरांचे विचार मंथन होणार आहे. तसेच देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

सर्व देशवासियांनी या देशभक्ती यात्रेत व 23मार्च रोजी च्या अमर बलिदान दिवस कार्यक्रमास आपली उपस्थिती राहून देशभक्तीच्या महान कार्यात सहभाग नोंदवावा,असे आव्हान दासराव हंबर्डे राष्ट्रीय सचिव जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली यांनी केले आहे.

