नांदेड| येथील भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिणच्या वतीने सोनखेड येथे समता सैनिक दलाच्या ९६ व्या वर्धापदिनानिमित्त एक दिवसीय भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हाध्यक्ष पि. एम. वाघमारे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, केंद्रीय शिक्षक म्हणून संतोष दुंडे, सिनियर डी ओ. आणि सचिव दादाराव कोल्हे, तसेच कंपनी कमांडर पंकज चावरे, विलास सोनकांबळे, सैनिक आनंद गोडबोले, गुणवंत गच्चे, रवी गच्चे, नामदेव गच्चे, सुरेश गोडबोले, अतुल गच्चे, तुकाराम खिल्लारे, प्रकाश खिल्लारे, आकाश थोरात, प्रकाश पवार, प्रज्ञाधर ढवळे, पांडुरंग सोनकाम्बळे यांच्यासह शाखा हिप्परगा ता. नायगाव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप, धूप आणि पुष्प पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशील, त्रिरत्न वंदना घेण्यात आली. समता सैनिक दलाच्या ध्वज वंदनेनंतर शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिरात जनक गोडबोले, नारायण धुतराज, बाबासाहेब धूतराज, विकास धूतराज, महादु खिल्लारे, संभाजी कांगडे, सुनिता खिल्लारे, अर्चना खिल्लारे, नंदा खिल्लारे, सुमन खिल्लारे, केवळाबाई धूतराज , निर्मला खिल्लारे, इंदुबाई खिल्लारे, कविता निवडंगे, लक्ष्मी चीन्तोरे, आम्रपाली धूतराज, अलका धूतराज, रमा धूतराज, निर्मला खिल्लारे, चंद्रकला खिल्लारे आणि तीलोतमा धूतराज यांनी सहभाग घेवून प्रशिक्षण घेतले.