नांदेड| बोर्ड ऑफ स्टडीच्या बैठकीत सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी एड) विष्णुपुरी,नांदेड येथील प्राचार्य डॉ. बालाजी गिरगांवकर यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर -विद्याशाखीय विद्याशाखेच्या अध्यापन पद्धती बोर्डाच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ नुसार या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून विद्या परिषद, संशोधन मान्यता समिती (RRC), आंतर -विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अशा विविध समित्यांमध्ये त्यांना कार्य करावे लागणार आहे. त्यांचा या पदाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राहणार आहे.
या निवडीबद्दल सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे, आंतर -विद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुनंदा रोडगे, विद्यापीठातील शिक्षणशास्त्र संकुलातील प्राध्यापक वर्ग, सहयोग संकुलातील सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, विविध अद्यापक महाविद्यालयातील प्राचार्य व त्यांच्या मित्र परिवाराने अभिनंदन करून भावी कार्यास शुभेछा दिल्या.