
लोहा| राज्यातील पावरफुल समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा सेल प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत शेतकरी नेते माजी आ शंकरअण्णा धोंडगे हे २६ मार्च रोजी भारत राष्ट्र समिती पक्षात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार आहेत. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व त्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थिती राहणार असून, मोठा जनसमुदाय या सोहळ्याचे साक्षीदार असतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते स्व शरद जोशी यांच्या मुशीत तयार झालेले शेतकरी नेते माजी आ शंकर अण्णा धोंडगे यांनी गॅट करार , खुली अर्थव्यवस्था, खुली बाजार व्यवस्था, शेती मालाला हमीभाव, भीक नको -हवे घामाचे दाम म्हणत गेल्या चार दशकात शेती व शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर संघर्ष केला आहे. सहा महिने त्यांनी शेतकऱ्याच्या लढ्यासाठी तुरुंगवास भोगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये देशाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातही त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. आणि आता बीआरएस (भारास) पक्षात प्रवेश करताना केवळ शेतकऱ्याचेच हित समोर ठेवून राजकीय दिशा ठरविली आहे.

लोह्यात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात जाण्या मागची भूमिका स्पष्ट केली. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या समावेश हैदराबाद येथे त्याची जवळपास चार तास सविस्तर चर्चा झाली शेती व शेतीविषयक त्या राज्याचे धोरण कसे उपयुक्त आहे. याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली व बीआरएस पक्षाच्या झेंड्याखाली राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा संघटित करणार असा विश्वास शंकर अण्णा धोंडगे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र सरकारचे शेतकरी विरोधी व उदासीन धोरणा आहे. पण शेजारच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी व मागासवर्गीयांसाठी राबविलेले धोरण ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम शेतीला २४ तास मोफत वीज शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रति दहा हजार रुपयाचे साहाय्य केले केले जाते. मग इतर राज्य का करत नाही (?) असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव २६ मार्च रोजी लोह्यात येत आहेत. त्याच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करणार असून हा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. असे माजी आ शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता पवार, प्रविण जेठेवाड,युवा नेते दिलीप दादा धोंडगे, मनोहर भोसीकर, शिवदास धर्मापुरीकर, प्रल्हाद पाटील फाजगे, छत्रु महाराज, अजय हंकारे आदी उपस्थित होते.

