
अर्धापूर, निळकंठ मदने| शहरातील अहिल्यादेवी नगरातील जेष्ठ नागरिक नामदेव यादोजी साखरे वय (८५) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले,हि माहिती त्यांची बहिणीला कळताच बुधवारी सकाळी माहेरी आपल्या भावाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आल्यावर घरात पाय ठेवताच बहिणींने आपला प्राण सोडला… त्यामुळे बहिणीची भावाप्रतीची माया किती घट्ट आहे याचा प्रत्यय अर्धापूर शहरवासीयांना पाहायला मिळाल्याने शहरात दिवसभर याच चर्चेला उधाण होते.

भाऊ-बहिणीचे नाते हे सर्वाधिक जवळचे आहे,भावाला बहिण राखी बांधूने,बहिणीचे सर्व दु:ख भावाने नाहिसे करणे,पंचमीला बहिणीसह बहिणीच्या मुलांना माहेरी घेऊन बोळवण करणं, दिवाळीला बहिणींने भावाला उटण लावून स्नान घालन,भाऊबीज ला भावाला दस्ती,टोपी देऊन कुंकू लावून भावाला कुणाची दृष्टी लागू नये म्हणून ज्वारीच्या पीठाचे मुटके ओवाळून टाकणे,बहिणीच्या मुली- मुलांच्या लग्नात नवरदेव किंवा नवरीला लग्नपीठावर मामाच घेऊन येवून लग्नात वधू व वराच्या मागे मामाच उभा राहतो. तो भावाला मिळालेला मोठा सन्मान,बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी माहेरची साडी आल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाहीत. यासह कितीतरी उदाहरणे बहिण-भावांचे नाते सर्वाधिक जवळचे असल्याचे दिसतात.

अर्धापूर येथील अहिल्यादेवी नगरात नामदेव यादोजी साखरे वय (८५) हे आजारी होते,त्यांच्यावर अधून मधून उपचार सुरू होते, यादरम्यान बहिण भावाला भेटून गेल्या होत्या,अगोदरच दोन भाऊ वारले होते,अखेर मंगळवारी रात्री भाऊ नामदेव साखरे यांचा मृत्यू झाला,हि बातमी सर्व नातलगांना बुधवारी सकाळी सांगितल्या गेले,त्यांची बहिण वसमत तालुक्यातील कोर्टा येथे दिलेल्या मथुराबाई संभाजी बोरकर वय(८०) जि हिंगोली या बुधवारी सकाळी नऊ वाजता माहेरी मयत भावाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी घरी येताच बहिणींंने आपले प्राण सोडले.

यावेळी उपस्थित अवाक् झाले… भावाला पाहताच बहिणीने सोडले प्राण… भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातलग व मित्रपरिवात एकच खळबळ उडाली,समाजातील कार्यकर्त्यांनी आधी अर्धापूरला भावाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले, नंतर बहिणीच्या मुलाने आपल्या गावात कोर्टा ता. वसमत जि.हिंगोली येथे अंत्यसंस्कार बुधवारीच करण्यात आले,या घटनेमुळे पुन्हा एकदा भाऊ-बहिणींच्या नात्यांचा उजाळा झाला.

